Beed : साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा – शितल जाधव

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

जगविख्यात अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी लहुजी शक्ती सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

या मागणीसाठीचे निवेदन लहुजी शक्ती सेनेच्या नेत्या शितल जाधव व कार्यकर्ते पक्षाच्या वतीने सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना शासकीय विश्रामगृह येथे आज 15 ऑगस्ट रोजी भेट घेऊन देण्यात आले. अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा व शासनाच्या वतीने पाठपुरावा करून विधानसभेत आवाज उठवावा, असे या निवेदनात म्हटले आहे.

बीड जिल्हा अध्यक्ष जीवन भाऊ सुतार, सोमनाथ भाऊ गवळी, युवक जिल्हा अध्यक्ष सचिन लोखंडे आदी उपस्थित होते.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here