Shirurkasar : व्यायामच माणसाला जीवनात तारू शकतो – पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 
शिरूरकासार – माणसाच्या शरीराला दररोज व्यायामाची नितांत गरज असून तोच माणसाला जीवनात तारू शकतो, असे मत जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी येथील पोलीस वसाहतीतील बाल उद्यान उद्घाटन प्रसंगी केले.
शिरूरकासार पोलीस स्टेशनचे सहपोलीस निरीक्षक सुरेश खाडे, डॉ.राजेंद्र पवार पोलीस उपनिरीक्षक मनोज बरुरे यांच्यासह कर्मचाऱ्यांची उपस्थितीत होती.
कार्यक्रमात पुढे बोलताना पोलीस अधिक्षक म्हणाले की कोरोनाच्या महासंकटात आपले सारे पोलीस बांधव आपली सेवा ईमान ईतबारे करीत असल्याने त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच असून या कालावधीत पोलीस बांधवांसह प्रत्येक माणसाने शरीर संपत्ती चांगली ठेवण्यासाठी दररोज नित्य नियमाने किमान एक तास व्यायाम करणे काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांचे आगमन झाल्यानंतर पोलीस वसाहती मधील लहान मुलांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. हर्ष पोद्दार यांनी देखील त्या मुलांना चॉकलेटची भेट दिली. उद्घाटन झाल्यानंतर पोद्दार यांनी स्वत: मुलांना उद्यानात ठेवण्यात आलेल्या घसरगुंडी आणि इतर खेळणीवर खेळायला लावले. आपली मुलं पोलीस अधीक्षकांसमोर खेळत असलेले पाहून पोलीस कर्मचारी देखील भारावून गेले होते. उद्घाटन कार्यक्रम संपल्यावर पोद्दार यांनी उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधला. यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात केलेल्या कामगिरीचे कौतुकही केले.
पोलीस कर्मचारी आणि लोकसहभागातून उद्यान

पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित नागरिक आणि व्यापारी यांच्या लोकसहभागातून या उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे. कोणी उद्यानात लावण्यासाठी झाडे तर कोणी कमान आणि इतर खेळणीचे साहित्य देऊन आपले योगदान दिले आहे. उद्यानाची सजावट तिरंगा रंगातील फुगे लावून केल्यामुळे पोलीस स्टेशनला चांगलीच शोभा आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here