Crime Breaking : खळबळजनक : बलात्काराचा गुन्हा मागे न घेतल्याने पीडितेच्या 10 वर्षीय मुलीला पेटवले

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

बलात्काराचा गुन्हा मागे न घेतल्याने आरोपीने पीडितेच्या 10 वर्षीय मुलीला पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची खळबळजनक घटना घडली. पारनेर तालुक्यातील ही खळबळजनक घटना आहे. ही चिमुकली या हल्ल्यात गंभीररित्या भाजली आहे. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर याप्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजाराम तरटे, असे या आरोपीचे नाव आहे.

तालुक्यातील वाघुंडे गावातील आदिवासी समाजातील एका महिलेवर बलात्कार करण्यात आला. याप्रकरणी पीडितीने दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी तरटेवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा मागे घेण्यासाठी संबंधित महिलेवर मोठा दबाव आणला जात होता. मात्र, या महिलेने दबावाला बळी न पडता गुन्हा मागे घेण्यास नकार दिला.

याचा राग डोक्यात धरून तरटे याने थेट महिलेच्या घरात घुसून तिच्या 10 वर्षाच्या मुलीला पेट्रोल ओतून पोळून दिले. या हल्ल्यात ही चिमुकली गंभीर रित्या भाजली. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील व पोलिस निरीक्षक राजेंद्र भोसले यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. याप्रकरणी संबंधित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून काल रात्री सुपा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस अधिकारी अजित पाटील हे करीत आहेत. याप्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात 2 जणांविरोधात गुन्हा दाखल केला असला तरी या घटनेमुळे पारनेर तालुक्यात एकाच खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here