”मै पल दो पल का शायर हूँ”; महेंद्र सिंग धोनीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

निवृत्तीची घोषणा जाहीर करताना धोनी झाला भावूक

महेंद्र सिंह धोनी आपली निवृत्ती घोषित करताना जुन्या आठवणींना उजाळा दिला. मै पल दो पल का शायर हूँ असे म्हणत धोनीने आपल्या सहकाऱ्यांसोबतचे क्षण व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केले आहेत.

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि विकेटकिपर महेंद्रसिंग धोनी यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या निवृत्तीच्या चर्चा रंगल्या होत्या. अखेर 15 ऑगस्टच्या दिवशीच महेंद्र सिंग धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. ही निवृत्ती जाहीर करताना त्याने एक भावनिक गाणं शेअर करत जुन्या आठवणी उजाळा दिला आहे.

भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक म्हणून धोनीचा लौकिक आहे. त्याचा हेलिकॉप्टर शॉट असो किंवा त्याने अनेकदा हातातून गेली अशी वाटणारी जिंकलेली मॅच असो धोनीचा खेळ क्रिकेटरसिक कधीही विसरणार नाहीत. अशाच आठवणी धोनीच्याही आहेत. त्याने भारतीय क्रिकेट संघात खेळायला सुरुवात केल्यापासून अखेरचा सामना. या काळातील आपल्या सहकाऱ्यांसोबतचे सर्व क्षण त्याने व्हिडीओच्या माध्यमातून पोस्ट केले आहेत. या फोटोंच्या व्हिडीओला मैं पल दो पल का शायर हूँ, असं गाणं आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here