धोनी पाठोपाठ सुरेश रैनानेही घेतला क्रिकेटमधून सन्यास

महेंद्र सिंग धोनी पाठोपाठ सुरेश रैनानेही निवृत्ती जाहीर करीत क्रिकेटमधून सन्यास घेतला. त्यामुळे क्रिकेट जगताला चांगलाच धक्का बसला आहे.

सुरेश रैनाने धोनी आणि टीम इंडियाच्या काही सहकाऱ्यांसोबत एक फोटो शेअर केला आहे. माही, तुमच्या सोबत खेळणे शानदार राहिले. तुमच्या कारकिर्दीत खेळायला भेटले याचा अभिमान आहे, धन्यवाद भारत, जय हिंद, असे शब्द सुरेश रैनाने धोनीसाठी लिहले आहेत.

सुरेश रैनाच्या आंतराष्ट्रीय क्रिकेट करियरमध्ये 18 टेस्ट मॅच, 226 वनडे सामने आणि 78 टी-20 इनटरनॅशनल मॅचमध्ये खेळला आहे. रैनाने एक शतक आणि सात अर्धशतकच्या जोरावर टेस्ट क्रिकेटमध्ये 768 रन बनवले आहेत. तर वनडेमध्ये रैनाने पाच शतक आणि 36 अर्धशतकी खेळ्या केल्या आहेत. यादरम्यान, 35 च्या सरासरीने 5615 रन काढले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here