वयोवृद्ध इसमास केले नातेवाईकांच्या स्वाधीन     

श्रीरामपूर :  तालुक्यातील वडाळा महादेव परिसरातील अशोकनगर फाटा ससे वस्ती येथील वयोवृद्ध व्यक्ती धनू किसन बनगैया( वय ८५), वर्ष हे आपल्या राहत्या घरातुन मुलगा रमेश यास माहिती देऊन कोल्हार या ठिकाणी शासकीय वृद्ध पेन्शन घेण्यासाठी गेले होते. घरातून एक ते दोन दिवस गावाकडे थांबतो असे असताना वृद्ध आजोबा धनु किसन बनगैया हे आपले काम आटपून श्रीरामपूर कडे निघाले रात्रीची वेळ व पाऊस चालू असल्या कारणाने कुठेही वाहन नसल्यामुळे रात्री साडेआठ ते नऊ दरम्यान श्रीरामपूर नेवासा रोड वरील रेल्वे ओव्हर ब्रिजवर पडलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांना जोराचा मार लागला असल्याने जवळून जाणारे ही वाहन थांबत नव्हते यावेळी सामाजिक कार्यकर्ते गोंधवणी येथील श्री. राऊत यांनी घटनेची माहिती हरेगाव फाटा पोलीस निवारा कक्षात याठिकाणी दिली. त्यावरुन कर्तव्यावर असलेले पो कॉ किरण पवार गृहरक्षक दलाचे महेश राशिनकर राजेंद्र देसाई यांनी घटनेची माहिती वरिष्ठ अधिकारी यांना कळविली. त्यावरून श्री धनु बनगैया यांना नागरिकांच्या मदतीने हरेगाव फाटा पोलीस निवारा  या ठिकाणी आणण्यात आले व परिसरात नागरिकांच्या मदतीने शोध मोहिम सुरू केली यावरून ससे वस्ती येथील पाण्याच्या टाकीजवळ आजोबा राहत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून आजोबांचा मुलगा रमेश यास व नातू यांना वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या आदेशानुसार समक्ष ताब्यात देण्यात आले. प्रसंगी बनगैया कुटुंबियाकडून पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे आभार मानले
Attachments area

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here