पिकांचे पंचनामे करून शेतकर्‍यांना दिलासा द्यावा

0

मराठा महासंघाचे श्रीरामपूरचे तालुकाध्यक्ष दिलीप थोरात यांची मागणी

श्रीरामपूर : पावसाळा सुरू होऊन २ महिने झाले आहे यापुढील पावसाळ्याचे २ महिने अवधी शिल्लक आहे तालुक्यामधीलच काही भागात तर पाऊस पडत आहे.
 प्रवरा नदीपात्र परीसरात पश्चिम व पूर्व भागातच बाजुस पट्ट्यात जास्त जोरदार पावसाचे आगमन झाले आहे इतर भागात हलकाच पाऊस सुरू असतानाच इतर ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने शेतकर्‍यांच्या तोडांशी आलेल्या उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे
त्याप्रमाणेच या लाॅकडाऊनच्या काळात शेतमाल फळांच्या बागा चारा पिके यांचे प्रंचड नुकसान झाल्याने शेतकर्‍यांसमोर मोठया अडचणी निर्माण झाल्या आहेत शासनाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करून शेतकर्‍यांना आर्थिक मदत करून दिलासा द्यावा अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाचे श्रीरामपूरचे  तालुकाध्यक्ष दिलीप थोरात यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केली आहे
पावसाळा २महिने शिल्लक आहे जुन महिन्यापासूनचे ते आॅगस्ट पर्यत तालुक्यात सरासरी पेक्षा सर्वाधिक पाऊस कोसळला आहेत काही मंडलात अतिवृष्टी झाली आहे. दिवसरात्र पावसाच्या सरी परिसरात पडत आहेत शेतात सोयबीन, कपाशी, बाजरी घास या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे
नेमकेच यावेळीच पाऊस वेळेत झाल्याने शेतकर्‍यांनी पिकांची पेरणी लागवड जास्त केली आहे काही भागातच अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांच्या उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले तर काही ठिकाणी पिके नष्ट झाली आहे प्रवरा नदीकाठ परिसरात डाळिंब पिकांचे मोठे नुकसान झाले
शासनाने शेतकर्‍यांच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या भागातच पिकांचे सरसकट पंचनामे करावेत तालुक्यातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करून शेतकर्‍यांना दिलासा देऊन आर्थिक मदत करावी अशी मागणी करत व तातडीने शासन दरबारी निर्णय घ्यावा अशी मागणी दिलीप थोरात यांनी केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here