Ahmednagar: भाजपच्या राज्य पॅनलिस्ट सदस्यपदी नितीन दिनकर यांची नियुक्ती

प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री


नेवासा : भाजपच्या राज्य पॅनलिस्ट सदस्यपदी भाजपचे नेवासा तालुका अध्यक्ष नितीन दिनकर यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे पत्र मुकुंद कुलकर्णी यांनी दिले आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्य प्रवक्ता म्हणून याआधी केशव उपाध्ये यांची निवड केली होती त्यानंतर आगामी काळासाठी राज्यात दहा प्रवक्ते व ३३ जणांची निवड महत्वाच्या चर्चा करण्यासाठी पॅनलिस्ट सदस्य म्हणून करण्यात आली असून पॅनलिस्ट सदस्य पदी भाजपचे नेवासा तालुकाध्यक्ष नितीन दिनकर यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे असेही भाजपचे कार्यालयीन सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
भाजपच्या राज्य पॅनलिस्ट सदस्यपदी भाजपचे नेवासा
तालुकाध्यक्ष नितीन सुरेश दिनकर यांची अहमदनगर जिल्हयातून ही निवड झाली आहे. सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या नितीन दिनकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता ते भाजपचे जिल्हा चिटणीस शिर्डी लोकसभा मतदार संघाचे बुथ प्रमुख व आता भाजपचे नेवासा तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळत असतांना त्यांची प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी थेट राज्य पॅनलिस्ट सदस्य पदी निवड केली आहे.
राज्य पॅनलिस्ट सदस्यपदी निवड झाल्याबद्दल नितीन दिनकर यांचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,आमदार राधाकृष्ण विखे पाटील,वैभव पिचड,स्नेहलता कोल्हे,भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे,जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर,विठ्ठलराव लंघे जिल्हा उपाध्यक्ष सचिन देसरडा यांनी अभिनंदन केले आहे.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here