Ashti : आष्टीत पहिल्याच दिवशी ६१९ जणांची चाचणी; त्यापैकी १८ पाॅझिटिव्ह

कोरोना अँटीजन चाचणीत पाच महिलांसह पुरूषांचा समावेश

कडा / वार्ताहर

आष्टीत आजपासून रॅपीड अॅटीजन चाचणी करण्यास सुरूवात झाली असून  दिवसभरात शहरातील तीन केंद्रांवर ६१९ चाचण्या घेण्यात आल्या. त्यापैकी १८ जण पाॅझिटिव्ह आढळून आल्याची माहिती नायब तहसिलदार तथा मुख्याधिकारी प्रदिप पांडूळे यांनी दिली आहे.

आष्टी शहरासह ग्रामीण भागात वाढत असलेल्या  कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव थांबावा, याच उद्देशाने व्यापारी, कामगार, दुधवाले, पाणी वाटप, भाजी विक्रेते आदिंची रॅपीड अॅटीजन तपासणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी कोरोना प्रादुर्भाव वाढत चालल्यामुळे  जिल्ह्यातील पाच शहरांमध्ये रॅपिड अँटीजन स्टेस्ट ही मोहिम राबविण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुुसार आष्टी शहरातील जिल्हा परिषद कन्या शाळा, जिल्हा परिषद माध्यमिक शाळा(मुलांची) व महात्मा गांधी विद्यालय या केंद्रांमध्ये आजपासून तीन दिवस सकाळी ८ वाजेपासून चाचण्यांना सुरूवात झाली आहे. मंगळवार दि.१८,१९ व २० अशी तीन दिवस चाचणी घेण्यात येणार आहेत. पहिल्याच दिवशी घेण्यात आलेल्या ६१९ नमुन्यापैकी १८ नमुने सकारात्मक आढळून आले असल्याची प्रदिप पांडूळे यांनी माध्यमांना दिली. प्रशासनाच्या वतीने क्रमवार करण्यात आलेल्या यादीत अनावधनाने यादीत नाव घ्यायचे राहिल्यास अशा व्यक्तींनीही आपली चाचणी करून घेऊन प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहन तहसिलदार वैभव महिंद्रकर यांनी केले.
शहरातील राम मंदिर गल्ली (३८) पुरूष, शनिचौक (२६) पुरूष, पेठगल्ली (६५) पुरूष, (५८) महिला मारवाडी गल्ली (४०), सायकड गल्ली (३५) पुरूष, सोलेवाडी (४०) पुरूष, वाळूंज (२७) पुरूष, सागर हाॅटेल पाठीमागे (४८) महिला, (५०) पुरूष, चिखली (६५) महिला, तर हनुमंतगाव (१६) महिला,(५८) महिला, (१०)पुरूष,(६५)पुरूष असे एकूण विविध भागातील १८ जण पाॅझिटिव्ह आले असून यामध्ये पुरूषांसह महिलांचा समावेश असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी संतोष कोठूळे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here