Shrigonda: भारत मंडी कर्मचारी कल्याण संघ समितीच्या राष्ट्रीय उपाध्यपदी: दिलीप डेबरे

श्रीगोंदा –  श्रीगोंदा बाजार समितीचे सचिव तथा महाराष्ट्र राज्य बाजार समिती कर्मचारी संघाचे अध्यक्ष दिलीप डेबरे यांची भारत मंडी कर्मचारी कल्याण संघ समिती या राष्ट्रीय पंजिकृत संघटन च्या राष्ट्रीय उपाध्यपदी निवड झाल्याचे नियुक्ती पत्र राष्ट्रीय सचिव अनिलकुमार शर्मा यांनी नूकतेच दिले आहे.

भारत मंडी कर्मचारी कल्याण संघ समिती मध्ये महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीगड, दिल्ली, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या राज्यातील बाजार समितीचे कर्मचारी सामिल असलेची माहिती दिलीप डेबरे यांनी दिली. या संघाचे माध्यमातुन भारतातील बाजार समिती कर्मचा-यांचे विविध प्रश्न सोडविणेचे प्रयत्न केले जाणार आहेत.
भारत सरकारने नुकतेच संपूर्ण देशामध्ये शेतीमाल अन्नधान्य नियमनमुक्ती केल्यामुळे बाजार समितीचे उत्पन्नात मोठी घट होणार आहे. यापुर्वी फळे व भाजीपाला नियमन मुक्त झाल्यामुळे बाजार समित्यांचे उत्पन्न घटलेले आहे. बाजार समितीस शासन कुठल्याही प्रकारचे अनुदान देत नाही परंतू संपुर्ण नियंत्रण शासनाचे आहे. बाजार समिती कर्मचा-यांचे वेतन हे बाजार समितीचे उत्पन्नातुन होत असल्याने उत्पन्न नसल्यामुळे कर्मचा-यांचे वेतनाचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे कर्मचा-यांवर उपासमारीची वेळ येणार आहे. केंद्र सरकारने देशामध्ये बाजार समित्यांचे खाजगीकरण करण्याचा घाट घातलेला आहे. देशातील बाजार समिती कर्मचा-यांना केंद्र शासनाचे अथवा राज्यशासन सेवेत घेण्यात यावे अथवा पगारासाठी अनुदान देण्यात यावे. अशी मागणी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व भारतीय कृषि मंत्री नरेंद्रजी तोमर यांचेकडे केली आहे. संघाचे माध्यमातुन कर्मचा-यांना शासन सेवेत घेण्यासाठी संपुर्ण देशामध्ये लढा उभारला जाणार असल्याची माहिती श्री. डेबरे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here