Karjat : बहुतांश भागात श्रावणी बैल पोळा साध्या पद्धतीने साजरा

प्रतिनिधी | राष्ट्रसह्याद्री
कर्जत : कर्जत शहरासह तालुक्यातील बहुतांश भागात मंगळवारी श्रावणी पोळा साजरा करण्यात आला असून यंदा सर्व सणांसह पोळ्या सणावरही कोरोनाचे सावट जाणवले गेले. लाडक्या सर्जा- राजाची मिरवणूक वाजत गाजत न काढता आल्याने शेतकरी ही नाराज होते.
     कर्जत शहर आणि  तालुका परिसरात बहुतांश भागात श्रावणी पोळा साजरा केला जातो. तर मोजक्याच भागात भाद्रपद पोळा साजरा केला जातो. मंगळवार दि.१८ रोजी श्रावणी पोळा साजरा झाला. शेतकऱ्याचे पशुधन असणारे गुरे जनावरे यांचा हा सण परंतु त्यावर ह्या कोरोना महामारीचे संकट जाणवले. दरवर्षी झूल, रंगरगोंटी आणि वाजत गाजत गावांच्या वेशीवर भरणारा पोळा आज मात्र पोळ्याच्या पार्श्वभूमीवर गावागावांच्या वेशी सुन्या वाटत होत्या. तर मिरवणुकीत ढोल ताशां, हलगीचा नादही यंदा घुमलाच नाही. त्यामुळे शेतकरीही काहीसा नाराज दिसत होता. संध्याकाळी आपआपल्या घरी जनावरांची विधिवत पूजा करीत पोळीचा नैवदय भरविण्यात आला. यंदा पाऊस पाणी पुरेसा असल्याने पोळा उत्साहात साजरा झाला असता मात्र कोरोनाचे रुग्ण शहरासह ग्रामीण भागात सापडत असल्याने अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here