Shirurkasar : पोळ्याच्या सणावर कोरोनाचे विरजण, सर्जा-राजा सजला पण गावा गावात नाही मिरला

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

शिरूरकासार – कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत चालले असून या पुढील सर्वच सणांवर काळी छाया पसरू लागली आहे. काल मंगळवारी कृषी प्रधान देशातील बळीराजाच्या पोळा सणावर कोरोनाचे संकट कोसळले अन् गावा गावातील ग्रामदैवत असलेल्या मंदिराच्या बाजूने मोठ्या थाटामाटात सजवलेला प्रत्येक बळीराजाचा सर्जा राजा आज न पाहिल्याने हुरहुर लागत आहे.

भारत हा कृषीप्रधान देश आहे. कोरोनाने थैमान घातल्यानंतर सरकारने गंभीर पावले उचलली सण ऊत्सवावर संकट आले असले तरी ते साध्या पद्धतीने साजरे करावेत, असे सांगितले आहेत. ते आपल्या हितासाठी आहेत. पुढील काळात आपल्याला कोरोनावर मात करण्यासाठी त्याच्या सोबत जगावेच लागणार असून येणारे सर्वच सण, उत्सव साध्या पद्धतीने साजरे करावे लागणार हे नक्की असले तरी पोळा हा सण बळीराजाचा आहे. संपूर्ण देशाचा अन्नदाता असलेल्या शेतकरी राजाच्या उत्पादकतेला जिवापाड हातभार लावणारा त्याचा जिवलग सर्जा राजा आहेत त्यांचा आजपर्यंत राज्यात नव्हे तर देश भरातील गावा गावात या दिवशी सजून धजून ग्रामदैवताला वेढे मारून ढोल ताषांच्या आवाजात मिरवणूक होत होती. परंतु या वर्षी बळीराजाच्या सर्जा राजा सजला परंतु न दिसल्याने गावा गावात हुरहूर लागत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here