प्रतिनिधी| राष्ट्र सह्याद्री

संध्या सुदेश सिंग परदेशी यांची मानव अधिकार न्याय ट्रस्टच्या महाराष्ट्र उपाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली.
मानव अधिकार ट्रस्टचे किशन गोयल यांनी संध्या परदेशी यांना महाराष्ट्र उपाध्यक्ष म्हणून मानव अधिकार ट्रस्टच्या पदाचे नियुक्ती पत्र दिले आहे. महाराष्ट्रामध्ये मानव अधिकार ट्रस्टच्या माध्यमातून त्यांना काम करण्याची संधी महाराष्ट्र लेव्हलवर मिळाली आहे. याबाबत त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.