यूपीत पुराव्याशिवाय एन्काऊंटर होतायेत

0

असदुद्दीन ओवैसींचा योगी सरकारवर निशाणा
प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री
नवी दिल्ली : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (एआयएमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी उत्तर प्रदेश सरकारवर निशाणा साधला आहे. उत्तर प्रदेश पोलिसांच्या एन्काऊंटर पॉलिसीवर सवाल करत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एन्काऊंटरसह नियम आणि योग्य प्रक्रियेत बदल केल्याचा आरोप असदुद्दीन ओवैसी यांनी केला आहे.
योगी सरकारवर आरोप करीत असदुद्दीन ओवैसी म्हणाले, ही केवळ औपचारिकता नाही. जुलमी सरकारपासून आपले रक्षण करण्यासाठी हाच मूळ आधार आहे. कोणालाही शिक्षा करण्याची ताकद पोलिसांना नाही. उत्तर प्रदेश वगळता, कोठे पुरावाशिवाय एन्काऊंटर होतो?
अनेक अशी उदाहरणे आहेत की, ज्यामध्ये पोलिसांच्या भीतीमुळे एन्काऊंटर पीडित कुटुंबीयांना या घटनेला आव्हान देण्याची भीती वाटते. काही घटनांमध्ये, यूपी पोलिसांनी कथितरित्या पीडित कुटुंबीयांविरोधात कारवाई केली. यामध्ये पीडित कुटुंबीयांची घरे पाडण्याची कारवाई आहे, असेही असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटले आहे.
याचबरोबर, असदुद्दीन ओवैसी यांनी उत्तर प्रदेश पोलिसांवर सुद्धा निशाणा साधला. यावेळी जातीय आणि जातीवादी संस्था कशी तयार झाली. हे उत्तर प्रदेश पोलिसांनी दाखवून दिले आहे. आपला हिंदुत्वाचा वैचारिक अजेंडा पुढे नेण्यासाठी उत्तर प्रदेश पोलीस योगी सरकारच्या हातातील कठपुतली बनले आहेत, असे असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here