केंद्र सरकारचा नोकरी शोधणार्‍या तरुणांना मोठा दिलासा

नॅशनल रिक्रूटमेंट एजेंसीला मान्यता
नवी दिल्ली : देशातील तरुणांसाठी केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत केंद्र सरकारने राष्ट्रीय भरती एजन्सीला मान्यता दिली आहे अशी माहिती मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. त्यामुळे यापूर्वी तरुणांना नोकरीसाठी बर्‍याच परीक्षा घ्याव्या लागतात आता केवळ एकच परीक्षा द्यावी लागणार आहे.
देशात 20 भरती एजन्सी आहेत, म्हणून प्रत्येक एजन्सीच्या परीक्षा देण्यासाठी विविध विविध ठिकाणी जावे लागते. आता राष्ट्रीय भरती एजन्सी (नॅशनल रिक्रूटमेंट एजेन्सी) सामान्य पात्रता परीक्षा घेईल. याचा फायदा कोट्यवधी तरुणांना होणार आहे. ही मागणी अनेक वर्षांपासून तरुणांकडून येत होती, पण केंद्राने निर्णय घेतला नव्हता.
आता राष्ट्रीय भरती एजन्सी तयार झाल्याने विद्यार्थ्यांच्या समस्या दूर होतील, त्यांचे पैसेही वाचतील आणि मानसिक आरोग्यही ठीक राहील. आता परीक्षा देण्यासाठी धावपळ करण्याची गरज नाही. केवळ एकच परीक्षा दिल्यानंतर तरुणांना आणखी पुढे जाण्याची संधी मिळेल असा विश्वास प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here