Pathardi : राहूल कारखिले यांची भटक्या विमुक्त आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार

2
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 
पाथर्डी तालुक्यातील सुप्रसिद्ध उद्योजक व नुकतेच भारतीय जनता पार्टीच्या भटक्या विमुक्त आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राहुल कारखेले यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
यावेळी लोकनेते अर्जुनराव शिरसाठ, डाॅ. श्रीधर देशमुख, पाथर्डीतील डी.फार्म सी.कॉलेजचे ज्येष्ठ प्रा.सुनील महाजन, पाथर्डी तालुका भाजपाचे संस्थापक सदस्य नागनाथ गर्जे, जगदंबादेवी पब्लिक ट्रस्टचे माजी विश्वस्त व शिक्षक संघटनेचे नेते प्रा.शिवाजी फुंदे सर, सुनील दौंड सर, पाथर्डीतील सुप्रसिद्ध याज्ञिक व स्वामी समर्थ पतसंस्थेचे मा.संचालक गिरीश जातेगावकर, शंकर महाराज मठातील ज्येष्ठ सेवेकरी व साधक ईश्वर जावळे, मढी ग्रामपंचायत सदस्य दिगंबर मरकड, सदाशिवभाऊ मरकड, अनिल कुलकर्णी आदी सर्वजण उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना राहुल यांनी भटक्या विमुक्तांच्या समस्या व त्यावर मुलभूत उपाय यावर लवकरच राज्यस्तरीय चर्चासत्र घडवून आणण्याचा मनोदय व्यक्त केला. त्यांच्या सर्व कार्याला व वाटचालीला सर्व मिञ परीवार कार्यकर्ते, विद्यार्थी संघाच्या वतीने पाथर्डी तालुका भाजपाचे संस्थापक सदस्य नागनाथ गर्जे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here