Newasa: दैव बलवत्तर म्हणून आख्खे कुटुंब बचावले; ‘सर्जा-राजा’ चा मात्र मृत्यू!

0

नेवासा : नेवासा तालुक्यातील खालाल पिप्रि येथे बैल पोळ्याच्या सणाच्या दुसऱ्याच दिवशी विजेच्या शॉक लागल्याने दोन बैलाचा मृत्यू झाल्याची घटना खालल पिप्रि येथे बुधवार सकाळी 11 वाजता घडली. ट्रान्सफार्मर परिसरातील तारांमध्ये उतरलेल्या विद्युत प्रवाहाने ही घटना घडली. दरम्यान, बैलगाडीत बसलेल्या 4 जणांनी तातडीने उड्या मारल्याने त्यांचे प्राण वाचले. शेतकरी बाबासाहेब जऱ्हाड वय 38 हे बैलगाडीत शेतात जात असताना त्यांच्यासोबत पत्नी अशाबाई जऱ्हाड वय 32, मुलगा अण्णासाहेब जऱ्हाड वय 12, मुलगी कविता वय 14 (रा. बकुपिपळगाव) कुटूंब आपल्या शेतात चारा आणण्यासाठी बैलगाडीत जात असताना शेजारील गावातील खलाल पिप्रि शिवारातून जात असताना रस्त्यावर विजेच्या तारा तुटुन खाली पडल्या होत्या. परंतु गवतामुळे त्या दिसून आल्या नाही. कच्चा रस्ता असल्याने व जमीन ओली असल्याने विजेच्या तारांना स्पर्स होताच सर्जा व राजा नाव असलेली बैल जोडीचा जागीच मृत्यू झाला. ट्रान्सफार्मर परिसरातील तारांमध्ये उतरलेल्या विद्युत प्रवाहाने ही घटना घडली. दरम्यान, लोखंडी बैलगाडीत बसलेल्या 4 जणांनी तातडीने उड्या मारल्याने ते कुटुंब बचावले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here