सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याच्या निर्णयावर शरद पवार बोलले,

वाचा काय म्हणाले शरद पवार, पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली महत्वाची टिपण्णी 

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याच्या सर्वोच्च निर्णयाच्या निर्णयानंतर शरद पवार यांनी ट्विट करून आपली पहिली प्रतिक्रिया नोंदवली. यावेळी महाराष्ट्र सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान करेना आणि सीबीआयला संपूर्ण सहकार्य करेन असे पवार म्हणाले. पण त्याच वेळी सीबीआयवर पवारांनी निशाणाही साधाला दाभोळकर हत्या प्रकरणाप्रमाणे याची परिणिती होऊ नये, असेही शरद पवार म्हणाले.

दाभोळकर यांची 20 ऑगस्टला हत्या झाली होती. 6 वर्षापूर्वी हा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. मात्र याप्रकरणात अद्यापही सीबीआयला मोठे काम करण्यात यश आले नाही. त्यामुळे सुशांतच्या बाबतीतही असे होऊ नए, असे शरद पवार यांनी सांगितले. सोबतच त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे नेते दाभोळकर यांना श्रद्धांजलीही अर्पण केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here