Beed : गणेश मंडळांनी लालबागच्या राजाचा आदर्श घ्यावा

0
कोरोना सामूहिक संसर्ग रोखण्यासाठी यंदा गणेशउत्सव टाळणे समाज हिताचा निर्णय-राजेंद्र मस्के
उत्साहावर संयम ठेवून घरातच करू या विघ्नहर्त्याची पूजा
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

covid-19 महामारीपासून बीड शहर व जिल्हा कोसो दूर होता. परंतु आज दुर्दैवाने आपण कोरोना स्पर्धेत पुढे आहोत. शहराच्या कानाकोपऱ्यात कोरोना रुग्ण आढळला आहे. केवळ संसर्गामुळे शहराला covid-19 ने विळखा घातला आहे. अशा परिस्थितीत गणेश उत्सव सार्वजनिकरित्या साजरा करणे कितपत योग्य आहे. याचा विचार सर्व गणेशभक्त व मंडळांनी करायला हवा. कोरोना सामूहिक संसर्ग रोखण्यासाठी बीड शहराला पुन्हा दहा दिवसाचा लॉकडाऊन स्वीकारावा लागला.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेश उत्सव २२ आॉगस्टपासून सुरु होत आहे. कोरोना अद्याप आटोक्यात आला नाही. उलट सर्वत्र रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. प्रादुर्भाव रोखण्याची जोखीम वाढली. महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गणेश मंडळासाठी सरकारने कडक नियम जाहीर केले. कडक निर्बंध आणी जिवीत्वाची टांगती तलवार यामुळे उत्सवावर भीतीचे सावट राहणार. सार्वजनिक आरोग्याचा धोका पत्कारण्या पेक्षा उत्साहावर संयम ठेवून घरामध्ये विघ्नहर्ता गणरायाचा उत्सव साजरा करणे सर्वांसाठी हिताचे आहे, असे आवाहन भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी केले आहे.

गणेशोत्सव महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवनातील अविभाज्य उत्सव तसा बीड शहराला ही गणेश उत्सवाची मोठी परंपरा आहे. कोणत्याही परीस्थितीत उत्सव साजरा करण्याचा पायंडा मोडलेला नाही. आज मात्र कोरोना महामारीने घातलेला विळखा आणि लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या आर्थिक खाई यामुळे जनजिवन विस्कळीत झाले. समाज चिंताग्रस्त अवस्थेत असताना अनाठायी खर्च करून उत्सव साजरा करणे हिताचे नाही. परिस्थीतीचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्ह्यातील गणेश मंडळांनी लालबागचा राजा गणपती मंडळाचा आदर्श घेऊन यंदा उत्सव टाळावा.
स्वातंत्र्यपूर्व काळात लोकांना एकत्रित करून जागृती निर्माण करण्यासाठी गणेश उत्सवाची सुरुवात झाली. परंतु आज दुर्दैवाने गर्दी टाळण्यासाठी गणेश उत्सव न करणे समाज हिताचे ठरत आहे. गेली तीन महिन्यापासून कोरोना महामारी विरोधात तीव्र लढा चालू आहे. जान आणि जहान सुरक्षित ठेवण्यासाठी डॉक्टर पोलीस, आरोग्य कर्मचारी, शिक्षक विविध विभागातील कर्मचारी कोरोना योद्धा म्हणून संघर्ष करत आहेत. लॉकडाऊनमुळे सामान्यजनांची अर्थव्यवस्था विस्कळीत झाली.
या बिकट परिस्थितीमध्ये गणेश मंडळांनी सामाजिक हिताला प्राधान्य देऊन यावर्षीचा गणेश उत्सव टाळावा. महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत करावी. दगडूशेठ हलवाई गणपती पुणे व जगविख्यात मुंबई येथील लालबाग राजा गणपती उत्सव सार्वजनिक मंडळासह अनेक मंडळांनी उत्सव साजरा न करण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत स्तुत्य समाजहिताचा असून या निर्णयाचा आदर्श जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळांनी उत्सव टाळून समाजहिताला हातभार लावला पाहिजे, असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी गणेश भक्त व गणेश मंडळांना केले केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here