दूध आंदोलन : दूध दरवाढीसाठी भाजपचे पत्र पाठवून पुन्हा महादूध एल्गार

दूधप्रश्नी तालुक्यातून मुख्यमंत्र्याना पाच हजार पोस्टकार्ड  पाठविणार : आमदार बबनराव पाचपुते 

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने कोरोना संकटाच्या काळात सर्व जनतेला वा-यावर सोडले आहे, जनतेला राज्य सरकारने काहीच मदत केली नाही, राज्यातील दूध उत्पादक शेतकरी अत्यंत अडचणीत सापडले आहेत, मुख्यमंत्र्यांना दूध उत्पादकांचे दुःख समजावे यासाठी दूधप्रश्नी विविध मागण्याचे पाच हजार पोस्टकार्ड मुख्यमंत्र्यांना तालुक्यातून पाठविणार असल्याचे आंदोलन कर्ते आमदार बबनराव पाचपुते यांनी काष्टी येथे आंदोलनाची सुरुवात करताना सांगितले. 

भाजपा महायुतीच्या वतीने २१ जुलै रोजी राज्यभर शासनाला दूध भेट देऊन १ ऑगस्ट रोजी राज्यभर आंदोलन करण्याचा भाजपाकडून निर्णय घेण्यात आलेला होता. दि १ ऑगस्ट रोजी अन्यायाविरुद्ध एल्गार करणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी असल्याने याच दिवशी दूध उत्पादक शेतक-यांच्या प्रश्नावर भाजपा श्रीगोंदा तालुक्याच्या वतीने श्रीगोंदा येथील शनिचौकामध्ये अहिंसक पध्द्तीने दूध वाटप करून ‘महा एल्गार आंदोलन करण्यात आले होते.
या आंदोलनाच्या निमित्ताने गायीच्या दुधाला सरसकट प्रति लिटर १० रुपये अनुदान देण्यात यावे, दूध भुकटी निर्यातीला प्रति किलो ५० रुपये अनुदान मिळावे, दूध खरेदीचा दर प्रति लिटर ३० रुपये करावा अशा मागण्या त्यावेळी करण्यात आलेल्या होत्या. मात्र, राज्य सरकारने राज्यभर झालेल्या आंदोलनाची कोणत्याही प्रकारची दखल न घेता दूध उत्पादक शेतक-यांना वा-यावर सोडून दिले. मागील केलेल्या आंदोलनामुळे सरकार दखल घेऊन निर्णय घेईल, काहीतरी घोषणा करेल अशी अपेक्षा होती.
मात्र, सरकारच्या वेळकाढू पणामुळे दूध उत्पादकांची सरकार क्रूर चेष्टा करत आहे. महिना उलटूनही सरकार दूध उत्पादकांना न्याय देऊ शकले नाही. त्यामुळे निष्क्रिय सरकारला जाग आणण्यासाठी श्रीगोंदा तालुका भाजपाच्या वतीने विविध मागण्याचे पाच हजार पोस्टकार्ड पाठवून आजपासून महादूध एल्गार आंदोलन सुरु करत असल्याचे आमदार पाचपुते यांनी सांगितले. व आमदार पाचपुते यांनी स्वतः दूध उत्पादक शेतक-यांच्या गोट्यावर जाऊन काही पोस्टकार्ड स्वीकारली. दूध उत्पादक शेतक-यांनी दूध दरवाढी बाबत चे पोस्टकार्ड स्वतः च्या नाव व सहीनिशी मुख्यमंत्र्यांना पाठवावेत, असे आवाहन आमदार पाचपुते यांनी यावेळी केले.
या आंदोलनात आमदार बबनराव पाचपुते, ज्येष्ठ नेते भगवानराव पाचपुते, जि.प. सदस्य सदाशिवराव पाचपुते, भाजपा तालुकाध्यक्ष संदीप नागवडे, उपसरपंच सुनील तात्या पाचपुते, अमोल पवार, भास्कर तात्या जगताप, शहाजी भोसले, लालासाहेब फाळके, चांगदेव मेजर पाचपुते, बाळासाहेब धुमाळ, राहुल टिमूने, बन्सी महाराज पाचपुते, रवींद्र दांगट  इ कार्यकर्ते व दूध उत्पादक शेतकरी सहभागी झाले होते.

दूध उत्पादकांच्या मागण्या सरकारने मान्य कराव्यात – संगमनेर भाजप

संगमनेर तालुक्‍यातील दूध उत्‍पादक शेतक-यांनी भाजप महायुतीच्‍या नेतृत्‍वाखाली पोस्‍ट कार्यालयात जावून मुख्‍यमंत्र्यांना या मागण्‍यांचे पत्र पाठविले. पोस्‍ट कार्यालय हे मध्‍यवर्ती प्रशासकीय इमारतीत असल्‍याने पत्र टाकण्‍यास गेलेल्‍या पदाधिकारी, कार्यकर्त्‍यांना गेटवरच अडविण्‍याचा प्रयत्‍न झाला. मात्र आंदोलनकर्त्‍यांनी आम्‍ही स्‍वत:च जावून पत्र टाकणार अशी भूमिका घेतल्‍याने प्रशासनासही नमते द्यावे लागले. १०० हून आधिक कार्यकर्ते आणि दूध उत्‍पादकांनी थेट प्रवेश व्‍दारातून प्रवेश मिळवून मुख्‍यमंत्र्यांच्‍या मातोश्री निवासस्‍थानी आपल्‍या मागण्‍यांचे पत्र पाठविले.

याप्रसंगी भाजपाचे तालुका डॉ.अशोक इथापे, शेतकरी संघटनेचे संतोष रोहोम, जनसेवा मंडळाचे तालुका अध्‍यक्ष अँड.भास्‍करराव दिघे, राजेश चौधरी, बाजार समितीचे माजी उपसभापती सतिष कानवडे, वैभव लांडगे आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते. तालुक्‍यातही विविध गावांमध्‍ये भाजपा महायुतीच्‍या वतीने मुख्‍यमंत्र्यांना दूध उत्‍पादकांनी मोठ्या संख्‍येने पत्र पाठविले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here