Ahmadnagar : जिल्ह्यात आतापर्यंत १२ हजार १५३ रुग्ण बरे होऊन परतले घरी

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७९.२५ टक्के; आज ५०६ रुग्णांना डिस्चार्ज तर वाढले ४१७ रुग्ण
अहमदनगर : जिल्ह्यात आज ५०६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे कोरोनातून बरे झालेल्या रुग्ण संख्येने १२ हजारांचा टप्पा ओलांडला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १२ हजार १५३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण आता ७९.२५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजल्यापासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४१७ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २९८८ इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ७१, अँटीजेन चाचणीत २४५ आणि खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १०१ रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ४६, संगमनेर ०३, नगर ग्रामीण ०४, कॅन्टोन्मेंट ०३, पारनेर ०३, अकोले ०८, जामखेड ०१, कर्जत ०१ आणि मिलीटरी ह़ॉस्पिटल ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज २४५  जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा ०८, संगमनेर ०८, राहाता २३, पाथर्डी १७, नगर ग्रामीण २८,
 श्रीरामपुर १८, कॅंटोन्मेंट ०९, नेवासा १६, श्रीगोंदा २५, पारनेर १५, अकोले १२, राहुरी १३, शेवगाव १२, कोपरगाव १८, जामखेड २१ आणि कर्जत ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या १०१ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा ४९, संगमनेर १८, राहाता ०२, नगर ग्रामीण १२,  श्रीरामपुर ०२, पारनेर ०४,अकोले ०५, शेवगाव ०१, कोपरगांव ०४ आणि जामखेड ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज ५०६ रुग्णांना  बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. मनपा १९१, संगमनेर ३६,
राहाता २८, पाथर्डी २०, नगर ग्रा.४०, श्रीरामपूर २४, कॅन्टोन्मेंट ०६, नेवासा २४, श्रीगोंदा १८, पारनेर २५, अकोले २०, राहुरी ०७, शेवगाव २८, कोपरगाव ०७,जामखेड २४, कर्जत ०५, आणि मिलिटरी हॉस्पिटल ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.
*बरे झालेली रुग्ण संख्या: १२१५३*
*उपचार सुरू असलेले रूग्ण: २९८८*
*मृत्यू: १९३*
*एकूण रूग्ण संख्या:१५३३४*
*(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here