Shrigonda Crime Breaking News : विसापूर फाटा येथे पूर्व वैमनस्यातून झालेल्या मारामारीत चौघा तरुणांचा मृत्यू

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर फाटा येथे पूर्व वैमनस्यातून झालेल्या आपआपसातील मारामारीत चार तरुणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना आज सायंकाळी चारच्या सुमारास घडली. 

लिंब्या हब्र्या काळे (वय २२, देऊळगाव सिद्धी, तालुका नगर), तर सूरेगाव येथील नातीक कुंजा चव्हाण (वय ४० वर्ष) नागेश कूंजा चव्हाण (वय १४ वर्ष), श्रीधर कूंजा चव्हाण (वय ३५), अशी चारही मयत तरुणांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व मयत विसापूर फाटा येथे गांजा आणण्यासाठी गेले असता त्यांच्यात जुन्या भांडणातून ४ वाजण्याच्या सुमारास मारामारी झाली. या मारामारीत चौघे जण जागीच ठार झाले. कुंजा चव्हाण यांच्या घरच्यांना माहिती झाल्यानंतर यातील तिघांना सुरेगाव येथील पालावर घेऊन आले. तर लिंब्या हाब्र्या काळे याला विसापूर फाटा येथेच सोडून दिले.

दरम्यान, घटनेची माहिती संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास समजताच बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरविंद माने, पोलीस उप निरीक्षक प्रकाश बोऱ्हाडे यांनी घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाई सुरू केली. याप्रकरणी अधिक तपास सुरू केला असल्याची प्राथमिक माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here