Shevgaon : प्रधानमंत्री पीकविमा अंतर्गत शेवगावसाठी 21 कोटी ३६ लक्ष  रुपये; आमदार मोनिका राजळे

0
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

प्रधानमंत्री पीकविमा योजना अंतर्गत शेवगाव तालुक्यासाठी कपाशी व ज्वारी पिकासाठी  २१  कोटी ३६  लक्ष रुपयांचा विमा मिळाला असल्याची माहिती आमदार मोनिका राजळे यांनी दिली. मागील वर्षी कपाशी व ज्वारी पिकाचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले असल्यामुळे पीकविमा मिळावा याकरिता शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर मागणी होती. याकरिता वेळोवेळी संबंधित विमा कंपनी तसेच शासनास पाठपुरावा करावा लागल्याचे त्यांनी सांगितले. 

प्रधानमंत्री पीकविमा योजना अंतर्गत कपाशी पिकासाठी तालुक्यातील १५,४०४ शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला असून ९ कोटी २२ लक्ष रुपये मिळाले आहेत. तर ज्वारी पिकासाठी १३७६१ शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीकविमा योजनाचा १२ कोटी १३ लक्ष रुपये मंजूर झाले आहेत.

यावर्षी पावसाचे वेळेवर आगमन झाले. परंतु बहुतेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे जोमात असलेले पीक वाया गेले. तूर, कपाशी आदी पिके पाण्यात गेली. सूचनेप्रमाणे केलेल्या पंचनाम्याचे पैसे शेतकऱ्यांना वेळेत मिळावे. त्याचप्रमाणे बहुतेक शेतकऱ्यांनी मूग व उडीद यासारखी कडधान्याची पिके केली परंतु सध्याच्या संततधार पावसामुळे शेंगेला मोड आले आहेत, यामुळे शेतकऱ्याची पंचनामा होणेसाठी मागणी आहे. विशेषतः तालुक्याच्या पूर्व भागात जास्त प्रमाणात मूग व उडीद पिके असून शेंगांनाच मोड आल्यामुळे मोट्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे पंचनामा होऊन नुकसान भरपाई मिळण्यासाठी शासन व संबंधित विभागाला विनंती केली असल्याचे आमदार मोनिका राजळे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here