कोरोना योद्धा : महावितरणचे तांत्रिक शंकर डाडर यांचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल सत्कार

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

कोरोना महामारीच्या काळात उत्कृष्ट कामगिरी बजावणारे महावितरणचे तांत्रिक शंकर डाडर यांना उत्कृष्ट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

देशामध्ये 1 मे हा कामगार दिन म्हणून साजरा केला जातो व प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावणारे कामगार व अधिकारी यांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येतो. परंतु यावर्षी देशावर कोरोनाचे संकट असल्याने हा पुरस्कार 1 मे ऐवजी 15 ऑगस्ट रोजी देण्यात आला. जामखेड महावितरण कंपनीने जामखेड येथील शंकर डाडर यांना कोरोना काळात उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल उपविभागाच्या वतीने 15 ऑगस्ट रोजी प्रभारी कार्यकारी अभियंता एस व्ही. कुऱ्हाडे, अभियंता परदेशी यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.

तसेच या काळात अनेक कामगारांनी आपल्या जीवाची बाजी लावून आपले काम चोख बजावले. त्यांनाही यावेळी कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अधिका-यांना देखील या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यात साहाय्यक अभियंता एच सी गावित, अभियंता देविदास सुपेकर, भरत नाईकनवरे, संदीप तिटके, सचिन जाधव, एस पी कदम, कुणाल साळवे, दीपक नेहरे यांना कर्जत महावितरणचे प्रभारी अभियंता एस व्ही कुऱ्हाडे याच्या हस्ते गौरविण्यात आले.

या पुरसकारामुळे कामगार व अधिकारी यांचे मनोबल वाढते. हे कोणत्याही काळात आपले कर्तव्य पार पाडण्यास सक्षम असतात.

  • प्रभारी कार्यकर्ता एस व्ही कुऱ्हाडे 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here