Pathardi Crime Breaking : पंजाब नॅशनल बँकेत चोरी, एटीएमचेही कुलूप तोडले

किती रकम गेली अद्याप तपशील नाही
पाथर्डी | प्रतिनिधी | अमोल राजे म्हस्के | राष्ट्र सह्याद्री 
पाथर्डी तालुक्यातील माणिकदौडीमधील पंजाब नॅशनल बँकेत अज्ञात चोरट्यांकडून शटरचे कुलूप तोडून चोरी केल्याचा प्रयत्न झाला आहे. बँकेतील किती रक्कम गेली याचा तपशील मिळू शकला नाही. बाजूलाच असलेले ए टी एम मशीनचे ही शटर कुलूप तोडून चोरट्याने उघडले आहे.
ही घटना गुरुवारी मध्यरात्री झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आज शुक्रवारी पहाटेच्या वेळी ग्रामस्थांना बँकेत चोरी झाल्याच्या निदर्शनास आले आहे. बँकेवर झालेल्या चोरीमुळे माणिकदौंड परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.
माणिकदौंडीच्या मुख्य रस्त्या लगत बँक असतांना चोरी झाली याचे आश्चर्य व्यक्त होत आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून बँकेची पाहणी करत आहे. बँकेमधील काय ऐवज गेला हे पुढे येईल.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here