ESIC : नोकरी गमावणा-या कामगारांना मोठा दिलासा, तीन महिने अर्धा पगार मिळणार

3

ही सुविधा कर्मचारी राज्य विमा महामंडळाचे सदस्य असणाऱ्या कामगारांना मिळणार

कोरोनाच्या संकटकाळात नोकरी गमावलेल्या लाखो कामगारांना केंद्र सरकारने दिलासा दिला आहे. या कामगारांना तीन महिने पगाराच्या 50 टक्के रक्कम बेरोजगारी भत्ता किंवा ‘अनएम्पलॉयमेंट बेनिफिट’च्या स्वरुपात दिली जाणार आहे. (Government to offer 50 percent of three months salary under ESIC as unemployment benefit to 4 million workers)

बेरोजगार भत्त्यासाठी केंद्राकडून पात्रता निकष शिथील करण्यात आले आहेत. केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार यांच्या अध्यक्षतेखाली कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ईएसआयसी) बोर्डाच्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली.

24 मार्च ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीत नोकरी गमावलेल्या/गमावणाऱ्या सुमारे 41 लाख लाभार्थ्यांना याचा फायदा होईल, असा अंदाज ईएसआयसीने व्यक्त केला आहे. ही सुविधा कर्मचारी राज्य विमा महामंडळाचे सदस्य असणाऱ्या कामगारांना मिळणार आहे.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here