नेट बँकिंगचे फायदे – तोटे

सध्या सर्वच गोष्टी व व्यवहार ह्या ऑनलाइन झाल्या आहेत. शाळा,कॉलेज,अनेक संस्था,बॅंका, हॉस्पिटल,दुकाने,व्यापारी इ सर्वच ठिकाणी ऑनलाइन सुविधा उपलब्ध असतातच. नेट बँकिंगलाच ऑनलाइन बँकिंग असेही म्हणतात. ही एक इलेक्ट्रॉनिक सिस्टिम आहे. जी वित्तीय संस्था किंवा बँकेच्या वेबसाइटच्या माध्यमातून त्यांच्या ग्राहकांना वित्तीय देवाण घेवाण आणि इतर सुविधा पुरवतात. नेट बँकिंग करण्यासाठी ग्राहकांच्या मोबाईल फोन किंवा कॉम्यूटरवर इंटरनेट गरजेचे आहे. हे सांगण्यामागे उद्देश फक्त इतकाच की, इंटरनेट बँकिंग हे ग्राहकांना मोबाईल डिव्हाईस किंवा कॉम्पुटरच्या आधारे बाहेर न जाता पैशांची देवाण घेवाण यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देतात. सध्या देशामध्ये नेट बँकिंगच्या सुविधा वाढल्या आहे आणि त्यांचा वापरही होत आहे.

नेट बँकिंगचे खूप फायदे होत आहे. नेट बॅंकिंगची सुविधा ग्राहकांना २४तास ७ दिवस उपलब्ध राहते. * ग्राहकांना रांगेमध्ये तासन्तास उभे राहून बिल भरावे लागत नाही.* ग्राहकांना रात्री कधी पण आपले अकाउंट बघू शकतो.* नेट बँकिंगमुळे ग्राहक पैसे कधीही एक ठिकाणाहून दुसरीकडे ट्रान्सफर करू शकतो.* नेट बँकिंगमुळे वेळेची बचत होते.* आपण आपल्या मोबाइलला कधीही कुठेही रिचार्ज करू शकतो.

नेट बँकिंगच्या फायद्याप्रमाणेच काही तोटे देखील आहेत.* काही वेळी इंटरनेट बँकिंगमुळे ग्राहकांना हॅकिंगची भीती असते.* तसेच जर सर्व्हर डाउन झाले तर नेट बँकिंग करणे अवघड आहे.* नेट बँकिंगमध्ये जर युजर्स हे आपले नाव आणि पासवर्ड विसरले व ते चुकीच्या व्यक्तीकडे गेले तर त्याचा अयोग्य वापर होऊ शकतो.

ग्राहकांनी ऑनलाइन फसवणुकीची तक्रार सायबर पोलिस ठाण्याकडे करायची आहे. सध्या बरेच गुन्हे हे नेट बँकिंगमुळे होत आहेत. सदर गुन्हे टाळण्यासाठी आय टी कायद्यामध्ये तरतुदी केल्या आहेत. अर्थातच माहिती तंत्रज्ञान नियम २००० आणि सायबर विनिमय अपील न्यायाधिकरण (कार्यपध्दती)२००० हा सायबर कायदा गुन्हेगारीला आळा बसावा म्हणून संमत करण्यात आला आहे. यामध्ये कलम ६६ सी नुसार जर एखाद्याचा पासवर्ड चोरी केला. तो परवानगीशिवाय वापरला, हस्ताक्षर किंवा फिंगर प्रिंटचा गैरवापर केला तर ३ वर्षे कैद व दंडाची शिक्षा आहे. तसेच अजून वेगवेगळे कलम या कायद्यामध्ये दिलेलं आहे.

आपण नेट बँकिंग हे रोजच्या व्यवहारात वापरत असतो. बदलत्या काळात नेटबँकींग अपरिहार्य असल्याने आपल्याला यासंदर्भात सर्व माहिती असणे व आवश्यक आहे. तसेच नेटबँकिंगचे फायदे तोटेही ज्ञात असणे गरजेचे आहे.

अॅड.शिवानी संभाजी झाडे. (९७६६३७६४१७) LL.B. LL.M.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here