Shrigonda Crime Breaking : चंदन चोर पकडले, 45 हजार रुपयांचे 15 किलो चंदन जप्त

1
प्रातिनिधिक छायाचित्र

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा पोलिसांनी आज तालुक्यातील टाकळी लोणार गावच्या शिवारात बापूसाहेब फंड यांच्या शेतातून 15 किलो वजनाचे 45 हजार रुपये किंमतीचे चंदन चोरणाऱ्या विलास हिरामण गायकवाड, संदीप पोपट पवार दोघे रा. चिंचणी ता. शिरूर या दोघांना ताब्यात घेतले आहे. बापूसाहेब फंड यांच्या फिर्यादीवरून दोघांविरोधात चंदन चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बापूसाहेब फंड यांच्या टाकळीलोणार येथील शिवारातील शेताच्या बांधावर चंदनाची दोन मोठी झाडे आहेत. आज (दि 21) फंड शेतात गेले असता त्यांना ही चंदनाची झाडे दिसली नाहीत. त्यामुळे त्यांनी त्याठिकाणी जाऊन पाहिले असता वरील दोन्ही आरोपींनी चंदनाचे झाड तोडले होते.

त्यामुळे फंड यांनी पोलिसांना माहिती दिली परंतु पोलीस येण्याचा सुगावा लागताच या दोन्ही आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु श्रीगोंदा सहायक पो नि राजेंद्र सानप, पो कॉ योगेश सुपेकर,पो कॉ किरण जाधव यांनी तात्काळ त्याठिकाणी जाऊन पळून जाणाऱ्या आरोपींचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. आरोपींकडून चोरलेले चंदन पोलिसांनी जप्त केले आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here