Ahmadnagar Corona Updates : आज ४५६ रुग्णांना मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७९.३१ टक्के, आज नव्या ५७१ बाधितांची रुग्णसंख्येत भर
अहमदनगर : जिल्ह्यात आज ४५६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १२ हजार ६०९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ७९.३१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरुवार ) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ५७१ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३०७२ इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १८४, अँटीजेन चाचणीत २७९ आणि खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १०८ रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १३४, राहाता ०१, पाथर्डी ०३,  नगर ग्रामीण ३२, कॅन्टोन्मेंट ०३, नेवासा ०२, पारनेर ०४, अकोले ०१, राहुरी ०१, कोपरगाव ०१, कर्जत ०१ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज २७९ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा ४४, संगमनेर २६, राहाता १३, पाथर्डी १४, श्रीरामपुर १४, कॅंटोन्मेंट १६, नेवासा २८, श्रीगोंदा २३, पारनेर १४, अकोले ०७, राहुरी २२, शेवगाव ०७, कोपरगाव १४, जामखेड ३१ आणि कर्जत ०६ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या १०८ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा ६७, संगमनेर ०५, राहाता ०३,  नगर ग्रामीण ०४,  श्रीरामपुर ०४, कॅंटोन्मेंट ०२, नेवासा ०४, श्रीगोंदा ०२, पारनेर ०१,अकोले ०५, राहुरी ०१, कोपरगांव ०२, जामखेड ०६ आणि कर्जत ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज ४५६ रुग्णांना  बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. मनपा २२४, संगमनेर २०, राहाता १३, पाथर्डी १४, नगर ग्रा.२३, श्रीरामपूर ०९, कॅन्टोन्मेंट १०, नेवासा २८, श्रीगोंदा २०, पारनेर ०२, अकोले १४, राहुरी १०, शेवगाव २५,
कोपरगाव ०८, जामखेड १०, कर्जत २५, मिलिटरी हॉस्पिटल ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.
*बरे झालेले एकूण रुग्ण:१२६०९*
*उपचार सुरू असलेले रूग्ण: ३०७२*
*मृत्यू: २१८*
*एकूण रूग्ण संख्या:१५८९९*
*(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)*

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here