Newasa Crime Breaking : ज्ञानेश्वर महाविद्यालयाच्या माजी प्राचार्यांच्या घरी दरोडा

सात तोळ्यांच्या गंठणसह दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला, झटापटीत कौशल्या आगळे जखमी 

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

नेवासाफाटा ते नेवासा रस्त्यावर ज्ञानेश्वर महाविद्यालयासमोर असलेल्या महाविद्यालयाचे माजी प्राचार्य रघुनाथराव आगळे सर यांच्या बंगल्यावर शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी दरोडा टाकून सात तोळ्याचे गंठणावर डल्ला मारला. कौशल्या आगळे यांच्या हातातील सोन्याच्या बांगड्या काढण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. मात्र, आरडाओरड झाल्यामुळे चोरट्यांनी अवघ्या ६ मिनिटातच सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारुन पसार झाले.

नेवासा ते नेवासा फाटा या मुख्य रस्त्यावर ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य रघुनाथराव आगळेसर यांचा बंगला आहे. शुक्रवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास हा दरोडा पडला. दरोडेखोरांनी बंगल्याचा मुख्य दरवाजा तोडून घरात प्रवेश केला होता. नेमका किती ऐवज चोरीला गेला याचा तपशील अद्याप समजू शकलेला नाही.

अप्पर पोलीस अधीक्षक दिपाली काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे, पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांच्यासह पोलीस पथके घटना स्थळी दाखल झाले आहेत. श्वान पथक व ठसे तज्ज्ञ ही घटनास्थळी दाखल झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here