Shrigonda : सूनेनंतर सासूचाही शेततळ्यात बुडून मृत्यू

4

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा तालुक्यातील महांडूळवाडी येथील सुमन गुलदगड या ४९ वर्षीय महिलेचा पाय घसरून शेत तळ्यात पडल्यामुळे मृत्यू झाला. ही घटना आज शनिवारी सकाळी आठच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक मुकेश बडे हे करत आहेत.

महांडूळवाडी येथील मयत सुमन गुलदगड यांच्या मृत्यूप्रकरणी पांडुरंग गुलदगड यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशनला दिलेल्या खबरीनुसार आज शनिवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास पांडुरंग गुलदगड हे शेतात बैल चरण्यासाठी बांधायला गेले होते. यावेळी त्यांना शेततळ्याच्या पाण्यावर एका महिलेचे प्रेत तरंगताना दिसले. त्यांनी आपल्या पुतण्याला बोलावून दोघांनी पाहणी केली असता मयत महिला ही सुमन गुलदगड असल्याचे समजले. त्यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात ही माहिती कळविली.
घटनास्थळी पोलीस नाईक मुकेश बडे यांनी धाव घेत घटनास्थळाची पाहणी करत पांडुरंग गुलदगड यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास पोलीस नाईक महेश बडे करत आहेत.

आठ दिवसांपूर्वी सुनेचाही शेततळ्यात बुडून मृत्यू 

सुप्रिया गुलदगड या २४ वर्षीय विवाहित महिलेचा दि.१३ ऑगस्ट रोजी शेतात गवत आणण्यासाठी गेली असता पाय घसरून शेततळ्यात पडल्यामुळे तिचा मृत्यू झाला होता. या घटनेला ८ दिवस होत नाहीत तोपर्यंत मयत सुप्रिया हिची सासू सुमन गुलदगड वय ४९ वर्ष यांचा मृतदेह आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास शेततळ्यातील पाण्यावर तरंगताना मिळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

4 COMMENTS

  1. Wow that was odd. I just wrote an really long comment but after I clicked submit my comment didn’t appear. Grrrr… well I’m not writing all that over again. Anyhow, just wanted to say fantastic blog!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here