Good News : Ahmadnagar Corona Updates : जिल्ह्यात बरे होणार्‍या रुग्ण संख्येने ओलांडला १३ हजारांचा टप्पा

आज ४४५ रुग्णांना मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१.५८ टक्के
आज नव्या ९८ बाधितांची रुग्णसंख्येत भर
अहमदनगर : जिल्ह्यात आज ४४५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्येने १३ हजारांचा टप्पा ओलांडला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १३ हजार ५४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे ८० टक्क्यांहून अधिक असून ते आता ८१.५८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ९८ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २७३० इतकी झाली आहे.
बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ६९, पाथर्डी ०१, नगर ग्रामीण ०२, कॅन्टोन्मेंट ०२, पारनेर ०६, राहुरी ०३, कोपरगाव ०६, जामखेड ०१, कर्जत ०१ आणि मिलीटरी ह़ॉस्पिटल ०७ अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज ४४५ रुग्णांना  बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये, मनपा १८४, संगमनेर ३७, राहाता १७, पाथर्डी १७, नगर ग्रा.१३, श्रीरामपूर १७, कॅन्टोन्मेंट ०४, नेवासा २४, श्रीगोंदा ११, पारनेर २०, अकोले १६,  राहुरी ०७, शेवगाव २१, कोपरगाव २४, जामखेड १३, कर्जत २० अशा रुग्णांचा समावेश आहे.
*बरे झालेली रुग्ण संख्या: १३०५४*
*उपचार सुरू असलेले रूग्ण:२७३०*
*मृत्यू: २१९*
*एकूण रूग्ण संख्या:१६००३*
*(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here