National Breaking : राजधानी दिल्लीत मोठी चकमक, इसिसच्या एका दहशतवाद्याला अटक

एका व्हिआयपीला मारण्याचा होता कट, अजून नाव उघड नाही, बॉम्बस्फोटचाही होता इरादा, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलची कारवाई, दहशतवाद्याकडून दोन प्रेशर कूकर, आयईडीसह काही हत्यारं आणि काही महत्वाची कागदपत्रं जप्त

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने ISIS च्या एका दहशतवाद्याला अटक केली आहे. त्याच्याकडून दोन प्रेशर कूकर, आयईडीसह काही हत्यारं आणि काही महत्वाची कागदपत्रं जप्त केली आहेत. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचे पोलिस उपायुक्त (DCP) प्रमोद सिंह कुशवाहा यांनी सांगितलं की, काल रात्री धौला कुआं परिसरात झालेल्या चकमकीत IED सह एका ISIS दहशतवाद्याला अटक केली आहे.

अटक करण्यापूर्वी रात्री11.12 वाजता दिल्लीच्या पोलिस आर्मा स्कूलजवळ पोलीस आणि अतिरेक्यामध्ये चकमक उडाली. पोलिसांनी धडक कारवाई करत अतिरेक्याला बेड्या ठोकल्या. या दहशतवाद्याचं नाव मोहम्मद युसुफ असं आहे. त्याच्याजवळून आयईडी स्फोटकांसह मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. घटनास्थळावरून दोन अतिरेकी फरार झाले असल्याची माहिती आहे.

4 COMMENTS

  1. You could certainly see your skills in the work you write. The world hopes for even more passionate writers like you who aren’t afraid to say how they believe. Always follow your heart.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here