Shrirampur Breaking : गोंडेगाव जवळ श्रीरामपूर-पूणतांबा राज्यमार्गावर पिक अप-इंडिका-टिव्हिएस स्टारचा विचित्र अपघात

2

चार लहानमुंलांसह 12 जण जखमी, इंडिका गाडीचे मोठे नुकसान

श्रीरामपूर-पूणतांबा राज्यमहामार्गावर पिक अप इंडिका व्हिस्टा आणि टिव्हिएस स्टार मोटारसायकलचा विचित्र अपघात झाला. यामध्ये 4 लहान मुलांसह 12 जण जखमी झाले आहेत. तर इंडिका गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात दुपारी एकच्या सुमारास झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीरामपूर-पूणतांबा राज्यमहामार्गावर इंडिका (एम एच 13 ए क्यू 0233) गाडी श्रीरामपूरहून पुणतांब्याकडे जात होती. यामध्ये सात प्रवासी होते. तर टीव्हिएस स्टार (एम एच 17 सीके 8884) ही मोटारसायकलवर दोन महिला एक पुरुष असे तिघेही भरधाव होते. ही मोटारसायकल इंडिका गाडीच्या पाठीमागे वेगात होती. याचवेळी महिंद्र पिक अप (एम एच 39 डब्लू 0168) गाडी कोपरगाव येथून पूणतांब्याला जात होती.

भरधाव असलेल्या पिक अप ने समोरून येणा-या इंडिकाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी तीव्र होती की इंडिका गाडीने पूर्ण यूटर्न घेऊन पाठीमागून येत असलेल्या टीव्हिएस स्टार मोटारसायकलला धडक दिली. यामध्ये मोटारसायकलवरील दोन्ही महिला व पुरुष जखमी झाले. तर इंडिकामधील सातजणही गंभीर जखमी झाले आहेत. पिक अपमध्ये असलेली एक व्यक्ती जखमी आहे.

दरम्यान, अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली. अपघातग्रस्तांना अनारसे व साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाली असून पिक चालकाला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स टेबल सतिश गोरे (दादा ) करीत आहे.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here