Karjat : कोरेगाव येथे विहिरीत तरंगत्या अवस्थेत आढळला मृतदेह

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

कर्जत तालुक्यातील कोरेगाव येथे गावाजवळील विहिरीत एका ज्येष्ठ नागरिक व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे.   कोरेगाव गावठाण जवळील गुलाबराव बाबुराव शेळके यांच्या विहिरीत एक मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे गावातील काही लोकांनी पाहिल्यानंतर सदर माहिती सरपंच काकासाहेब शेळके यांना देण्यात आली.

कर्जत पोलिस स्टेशनला ही माहिती दिली असता पोलीस हवालदार महादेव गाडे, पो कॉ वैभव सुपेकर, पो कॉ विकास चंदन हे या ठिकाणी तातडीने पोहोचले व त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने सदर मृतदेह विहिरीच्या बाहेर काढला.

ही व्यक्ती कोरेगाव जवळील पेटकरवस्ती येथील असून नवनाथ बापूराव पेटकर (वय ५५) असे नाव असल्याची माहिती समजते. या व्यक्तीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कर्जत उपजिल्हा रुग्णालयाकडे पाठविण्यात आला आहे. या व्यक्तीने आत्महत्या केली की घातपात आहे. हे पुढील तपासातून पुढे येणार आहे. कर्जत पोलिस पुढील तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here