Beed : देवा श्रीगणेशाचे घरोघरी आगमन; पण नेहमीचा उत्साह नाही

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

बीडसह संपूर्ण जिल्ह्यामध्ये गणपतीबाप्पाचे घरोघरी आगमन झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश उत्सव साजरा होत आहे. पण दरवर्षीचा मोठ्या प्रमाणात असलेला उत्साह यंदा दिसून येत नाही. 

सार्वजनिक गणेश मंडळांना गणपती बाप्पा बसवण्यासाठी परवानगी दिली नाही. त्यामुळे मूर्तीकार व मूर्ती विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आलेली पाहावयास मिळाली. जनतेचा उत्साह मोठ्या प्रमाणात असला तरी यंदा चेह-यावर वेगळाच भाव आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा गणेश मूर्ती विक्रेत्यांची दुकानेदेखील कमी प्रमाणात पाहावयास मिळाली.

प्रत्येक जण आपल्या घरी गणपती बाप्पा बसवण्यासाठी घेऊन जात आहेत पण जनतेमध्ये फारसा उल्हास दिसत नाही. तसेच उत्साह वाटत नाही. गणपती मूर्ती विक्रींना देखील यंदा उठाव दिसत नाहीए. सध्याच्या परिस्थितीत विक्रेते घाट्यात जात असताना दिसत आहे.

आमचे प्रतिनिधी शितलकुमार जाधव यांनी दुकानदाराची व ग्राहकांशी संवाद साधला असता कोरोनाच्या संकटामुळे यावर्षी गणेश उत्सवाला प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे मूर्ती खरेदीचा खर्च देखील निघत नाहीए. यामुळे गणपती मूर्ती विक्रेते हवालदिल झालेले दिसत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here