Shirurkasar : गणपती बप्पा मोरया कोरोनाला हरवूया

3
घराघरात झाले गणरायांचे स्वागत
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री | जगन्नाथ परजणे

आजचा दिवस म्हणजे सर्वांच्याच आनंदाचा दिवस गणरायाचे आगमन झाले. घराघरात बाप्पांचे स्वागत करण्यात आले असून गणपती बप्पा मोरया कोरोनाला हरवूया, असा जयघोष बीड जिल्ह्यासह शिरूरकासार तालुक्यात दिवसभर घुमत होता.
कोरोनाच्या महाभयंकर या संसंर्ग रोगाने जगासमोर मोठे अव्हान उभे केले. यामुळे सर्वांनाच आपल्या अमुल्य जीवासाठी
भीती बाळगून जवळपास सहा महिने काढावे लागले आहेत. अदृश्य असलेल्या विषाणूने माणसाचे जगणे हराम केले आहे.
माणसात माणूस न राहिल्याने माणसाचे माणूसपण हरवले आहे.
सर्वाचेच उद्योगधंदे बंद राहिल्याने आर्थिक गणित पूर्णत: बिघडले. गोरगरिबांचा रोजगार हरवल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. असे असताना दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालली असून सर्वांचेच सण उत्सव साध्या पद्धतीने साजरे करावे लागत आहेत. बळीराजाचा पोळा सण अत्यंत साध्या पध्दतीने साजरा करावा लागला. अति अनंदाचा उत्सव गणेश उत्सव यांना विघ्नहर्ता, गणराया, बप्पा गणपती, यासह नाव असलेल्या गणपती बप्पांचे आज आगमन झाले बीड जिल्ह्यासह तालुक्यात घराघरांमध्ये त्यांचे स्वागत करण्यात आले असून एकच नारा घुमत होता. तो म्हणजे गणपती बप्पा मोरया, कोरोनाला हरवूया. आज प्रत्येकाच्या मनामनात उत्साह व्यक्त होत आहे. परंतु याचा जल्लोष मात्र साजरा करता
येत नसल्याने वाईट वाटत आहे.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here