Shrigonda Crime : ग्रील उचकटून घरात प्रवेश करून तब्बल पावणेतीन लाखांचा मुद्देमाल लंपास

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 
श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रिक या ठिकाणी अज्ञात चोरट्याने घराच्या खिडकीचे ग्रील उचकटून घरात प्रवेश करून लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्याविरोधात पांडुरंग पर्वती मोटे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव या ठिकाणी राहणारे फिर्यादी पांडुरंग पर्वती मोटे हे शेती करून आपली उपजीविका भागवतात. शुक्रवारी (दि21) नेहमीप्रमाणे दिवसभर शेतात काम करून सायंकाळी जेवण झाल्यावर गाढ झोपले होते. याचा फायदा घेत चोरट्याने मध्यरात्रीनंतर दोनच्या सुमारास मोटे यांच्या राहत्या घराचे मागील बाजूस असलेल्या खिडकीचे ग्रील उचकटून घरात प्रवेश केला. घरातील रोख रकमेसह घरातील सोन्या चांदीचे, असा मिळून एकूण 2,87,000/-रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला.
या घटनेची माहिती मिळताच श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करून त्यांनी गु.र.नं क I1007/2020 भा.द.वी.क.457,380 प्रमाणे अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गावीत हे करत आहेत.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here