Shevgaon : प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत शेतक-यांना 21 कोटींचा विमा

1
सभापती क्षितीज घुले यांच्या पाठपुराव्याला यश

शेवगाव तालुक्यासाठी साडे एकवीस कोटीचा विमा मंजूर झाला असुन प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत कपाशी व ज्वारी पिकासाठी २१ कोटी ३६ लाख रुपयाचा विमा शेतकऱ्यांना मिळाला असल्याची माहिती शेवगाव पंचायत समितीचे सभापती क्षितीज घुले यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.
मागील वर्षी कपाशी व ज्वारी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते आणि नुकसान झालेल्या  पिक विमा त्वरीत मिळावा यासाठी सभापती घुले यांच्याकडे शेतकऱ्यांनी वेळोवेळी  मागणी करण्यात आली होती त्यांची दखल घेऊन घुले यांनी विमा कंपनीशी वेळोवेळी संपर्क साधत सतत  पाठपुरावा केला आजमितीला पीक विमा मंजूर झाला आसुन शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात आली आहे.
प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत कपाशीसाठी तालुक्यातील १५ हजार ४०० शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ९ कोटी २२ लाख रुपये विमा देण्यात आला असुन  आहेत ज्वारी पिकासाठी १३७६१ एक शेतक-यांना प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा १२ कोटी १३ लाख रुपये मंजूर झाले आहेत यावर्षी पावसाचे वेळेवर आगमन झाले परंतु बहुतेक ठिकाणी अतिवृष्टी जोमात झाली असल्याने  तूर ,कपाशी, मुग, ज्वारी बाजरी आदी पिके पाण्यात गेली आहेत तरी नुकसान ग्रस्त पिकांचे त्वरीत पंचनामे करण्याची मागणी शासन दरबारी करण्यात आली आहे.
अनिल मडके कृषिऊत्पन्न बाजार समिती सभापती शेवगांव
मागील वर्षीच्या कपाशी व ज्वारीचा पिक विमा लाभधारक शेतकऱ्यांना मिळावा यासाठी सभापती क्षितीज घुले यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून विमा कंपनीला विमा देण्यास भाग पाडले घुले यांच्या प्रयत्नामुळे विमा मंजुर झाल्याचे मडके यांनी सांगितले. 

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here