Shrirampur : वांगी बुद्रुक-गणेश खिंड देवस्थान ट्रस्टचा अखंड हरिनाम सप्ताह बंद ठेवण्याचा निर्णय

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीरामपूर तालुक्यातील प्रसिद्ध वरद गजानन गणेश खिंड वांगी बुद्रुक येथे गेली तीस वर्षांपासून अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा सध्याच्या कोरोना संकटामुळे अखंड हरिनाम सप्ताह बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु सप्ताहामध्ये खंड पडू नये म्हणून फक्त हरिभक्त परायण किसन महाराज पवार व हरिभक्त परायण वाकडी महाराज हे ज्ञानेश्वरी पारायण करणार असून चार ते पाच महिला भजनी मंडळाच्या महिला हरिपाठ करणार आहे, अशी माहिती ट्रस्टने दिली.

गेली तीस वर्षापासून गुरुवर्य महंत हरिभक्त परायण भास्करगिरीजी महाराज यांच्या अधिपत्याखाली हा सप्ताह चालू आहे. परंतु चालू वर्षी आज गणेश चतुर्थीला चालू होणारा सप्ताह भास्करगिरीजी महाराज यांच्या सूचनेप्रमाणे देवस्थान ट्रस्टने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दररोज दोन महाराज ज्ञानेश्वरी पारायण करणार असून सांगतेच्या दिवशी अगदी मोजक्या दहा ते पंधरा वारकरी काल्याचा अभंग म्हणून देवाला नैवेद्य देणार आहे. भाविकांनी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे ट्रस्टच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

यावेळी हरिभक्त परायण किसन महाराज पवार हरिभक्त परायण भिमभाऊ महाराज चितळकर हरिभक्त परायण वाकडे महाराज देवस्थान ट्रस्ट दत्तात्रय पवार कारेगाव वि स सो चे जालिंदर पाटील होले शुभम पवार सेवेकरी मदन माने साहेबराव बोठे नामदेव थोरात काकासाहेब चितळकर संदीप चितळकर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here