Humanity: मुलीचे लग्न जवळ आल्याने खरेदीसाठी दुचाकीवर निघालेल्या आई वडीलांचा अपघाती मृत्यू… अनाथ भावंडाच्या मदतीसाठी धावली मराठा वर्ल्ड टीम

2
Dadasaheb Dongre | Rashtra Sahyadri
शेवगाव |प्रतिनिधी  : मोठया मुलीचे लग्न जवळ आल्याने खरेदीसाठी दुचाकीवर निघालेल्या आई वडीलांचा अपघाती मृत्यू झाला. पाथर्डी तालुक्यातील कळसपिंप्री येथील अनाथ झालेल्या दोन बहिणी व एका भावंडाच्या मदतीसाठी मराठा वर्ल्ड टीमचे सदस्य धावून येत रोख रक्कम, फळे व संसारउपयोगी साहीत्य भेट देवून अनाथ कुटूंबाला आधार दिला.
      पाथर्डी तालुक्यातील कळसपिंप्री येथील मोलमजूरी करुन संजय व योगीता गाडे हे दामप्त्य आई कलाबाई, वडील भिमराज, पदवीचे शिक्षण घेत असलेली मोठी मुलगी ऋतूजा, बारावीत असलेली मुलगी प्रतिक्षा व दहावीत असलेला छोटा मुलगा धनंजय या कुटूंबाच्या उदर्निवाहाची सर्व जबाबदारी त्यांच्या खादयांवर होती. अवघी १० गुंठे जमीन असलेल्या या कुटूंबाच्या नशीबी गरीबी पाचीला पुजलेली होती. या सर्वांवर मात करुन संजयने कुटूंबाची जबाबदारी लिलला पार पाडली होती. मोठी मुलगी ऋतूजा हीचा विवाह पाथर्डी तालुक्यातील पागोरी पिपंळगाव येथील जयदीप आरोळे या युवकाशी जुलै महिन्यात ठरला होता. त्यासाठी संजय व योगीता हे पती पत्नी पागोरी पिंपळगाव येथे लग्नाच्या खरेदीसाठी बँकेतून पैसे काढण्यासाठी दुचाकीवरुन निघाले होते. कोरडगाव शिवारात त्यांच्या दुचाकीला चारचाकी वाहनाची जोराची धडक बसली. या धडकेत दोघे पती पत्नी जागीच मृत्यूमुखी पडले. हा अपघात सुखाचे सर्व क्षण बाजूला ठेवून तीन भावंडांना कायमचे दु:खाच्या घाईत लोटून गेला. ती मुले आई वडीलांविना अनाथ झाली आहेत.
     याबाबतची माहिती मिळाल्यावर शेवगाव येथील मराठा वर्ल्ड टीमचे सदस्यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून निधी जमा करुन गाडे कुटूंबातील दोन नंबरची मुलगी प्रतीक्षा व मुलगा धनंजय यांच्या बँक खात्यामध्ये प्रत्येकी १५ हजार रुपये जमा केले. त्या स्लिपा फळे व मिठाई गाडे कुटूंबाच्या घरी जावून कुटूंबाकडे या सदस्यांनी दिल्या. तसेच मोठी मुलगी ऋतूजा हीचा ता.३० आँगस्ट रोजी जयदीप आरोळे या युवकाशी होणा-या विवाहात प्रसंगी संसारउपयोगी साहीत्य भेट देणार आहेत. शेवगाव येथील माजी प्राचार्य दिलीप फलके यांच्यावतीने मुलगा धनंजय याची शालेय शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. तसेच वाघोली येथील युवक कार्यकर्ते उमेश भालसिंग हे वैयक्तिक ऋतूजाच्या लग्नातील संपूर्ण अन्नदानाचा खर्च करणार आहेत.
     ऋतूजाचा विवाह आई वडीलांशिवाय होणार असून समाजातील दानशूर व्यक्तींमुंळे या दामप्त्यांसह दोन्ही भावंडांना बळ देणार ठरेल. या गाडे कुटूंबाच्या मदतीसाठी समाजातील आणखी दानशूर व्यक्तींनी पुढे येवून मदत करावी असे आवाहन मराठा वर्ल्ड टीमने केले आले.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here