घोड कॅनलवरील पूल पडण्याच्या मार्गावर.. पुलाचे काम करा अन्यथा आंदोलन : संभाजी ब्रिगेड

0

Dada Sonavne | Rashtra Sahyadri

श्रीगोंदा | प्रतिनिधी :- श्रीगोंदा टाकळी रोड, जिल्हा मार्ग १४१ क्रमांक वरील घोड कॅनल अखत्यारीत येणारा पूल पडला असून, ओवरलोडींग वाहने या रोड वरून भरपूर प्रमाणात वाहत असल्यामुळे १९६० साली बांधकाम झालेला पुल पडण्याच्या मार्गावर आहे.

यात दुर्घटना घडल्यास निरपराध लोकांचा बळी जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत हा रस्ता येत असून, या रस्त्यावरील साधारणता दहा किलोमीटर अंतरामध्ये छोटे – मोठे ३० पूल आहेत. त्यामधील हा १९६० साली बांधलेला पूल आज शेवटचा श्वास घेत आहे. या रोडवर ओव्हरलोडींगमुळे रस्त्याची दुरवस्था झालेली आहे.

ओव्हर लोडिंग गाड्या रोड वरून, जाण्यास प्रतिबंध करण्यात यावा, यासाठी श्रीगोंदा पोलीस स्टेशनने सहकार्य करावे. तसेच, हा पूल कुठल्याही क्षणी पडू शकतो आणि निरपराध लोक यामध्ये बळी जाऊ शकतात. हा पूल घोड कॅनलच्या अखत्यारीत येत असल्यामुळे पुलाची देखभाल – दुरुस्ती हे नमूद विभागाने केली पाहिजे. असे मुख्यमंत्री सडक योजनेचे अधिकारी सांगत आहेत.

याचबरोबर दुरुस्ती आमच्याकडे नाही. घोड कँनलच्या अधिकाऱ्यांना फोन केला असता, ते आम्ही पुल दुरुस्तीचा प्रस्ताव दिलेला असल्याचे सांगत आहेत. या पुलाचे काम लवकरात लवकर न झाल्यास संभाजी ब्रिगेड तीव्र आंदोलन छेडनार असल्याचे नानासाहेब शिंदे यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here