Humanity: कोरोनाग्रस्तांच्या मूत्यूनंतर मूठमाती देण्याची जबाबदारी निभावणारा ‘हा’ खरा कोरोना योद्धा…

कोल्हापूर आनिल पाटील

: कोरोना व्हायरसच्या या संकटात समाजांमध्ये आजार आणि मृत्यूबरोबरच भीतीही शिरकाव करते आहे. ही भीती अनेकदा रोग आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूपेक्षाही भयंकर असते, आणि हीच भीती माणसाच्या हातून चुका घडवून आणते.
कोरोनाच्या या संकटकाळात भीती मानवता आणि माणुसकी यांचा पराभव करताना दिसतेय. आपण आपल्याच माणसांच्या मदतीसाठी धावून जाताना दिसत नाही, यामागेही भीती हेच कारण आहे.


भारतीय परंपरेत देहाला कधीच इतकं महत्त्व देण्यात आलेलं नाही. संत परंपरा आणि आपल्या ज्ञान परंपरेत देहाला आत्म्याच्या मुक्कामाचं अस्थायी ठिकाण मानलं गेलं आहे. देह नश्वर, अशाश्वत, अनित्य मानला गेला आहे. त्याची तुलना मुठीतून झरझर निघून जाणाऱ्या वाळूशी, झाडाच्या पानावरच्या दवबिंदूशी करण्यात आली आहे. मात्र, आधुनिकतेने देहालाच सगळं महत्त्व बहाल केलं आहे. आत्म आणि आत्मा यांना काही अर्थच उरलेला नाही.
अशा संकटातही हसुर दुमाला येथील युवराज विष्णु पोवार यांनी सर्वोतोपरी मदत करून माणुसकी दाखविली आहे.
कोरोना संकंटकाळात हाॅस्पिटलना रक्तपुरवठा कमी पडत होता. लाॅकडाऊन मुळे रक्तपेढया ओस पडल्या होत्या. रक्तदाते इच्छा असुनही भितीमुळे पुढे येत नव्हते, या वेळी युवराज पोवार यांनी जीवन आधार फाउंडेशन रेस्क्यु फोर्स च्या माध्यमातुन मार्च महिन्यात रक्तदान शिबीर आयोजित करून हाॅस्पिटलना रक्त पुरवठा केला. एवढेच नव्हे तर लाॅकडाऊन काळात गोरगरीब लोकाना गहु, तांदुळ, तेल, साखर, कांदे बटाटे असे दोन ते तीन टन जीवनावश्यक वस्तुचा पुरवठा करून त्यांचे जीवन सुसाहय करणेचा प्रयत्न केला.
शिवाय लाॅकडाऊन काळात जेव्हा फक्त रस्तयावर पोलीस होते. त्यावेळी पोलीसाना चहा बिस्कीटे, ताकाचे वाटप करून माणुसकीचे दर्शन घडवले. यावेळी जात, धर्म, लिंग सर्व गौण आहे. केवळ माणुसकी महत्त्वाची आहे. हे आपल्या कृतीतुन दाखवुन दिले.याकामी त्यांना फाउंडेशनचे राज्य पदाधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
युवराज पोवार जीवन आधार फाउंडेशन रेस्क्यु फोर्स कोल्हापुर जिल्हाचे अध्यक्ष असुन संत रोहीदास चर्मकार सेवाभावी संस्थेचे राज्य सहसचिव आहेत.
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांना मूठमाती द्यायला जाण्यासाठी कुणी तयार नाही, अशी परिस्थितीत युवराज पोवार यांचे कार्य अतुलनिय आहे यात शंका नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here