Corona: संगमनेरकरांच्या काळजीत भर , कोरोना बाधित रुग्ण संख्या 1515 वर पोहचली …..

0

Rashtra Sahyadri Updates…
विकास वाव्हळ | संगमनेर :
संगमनेर मध्ये कोरोना विष्णूचे संक्रमण मोठ्या प्रमाणात होत असून काल सकाळी, रात्री व उशिरा रात्री पर्यंतची एकत्रित रुग्ण संख्याही 84 वर पोहचली त्यामुळे आता पर्यंतची एकूण बाधित रुग्ण संख्या ही 1515 वर जाऊन पोहचली आहे. शहरातील बहुतेक भागत व तालुक्यात ही आता पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे संगमनेरकरांच्या काळजीत अधिकच भर पडत आहे.

संगमनेर मध्ये सध्या शासकीय तसेच खाजगी प्रयोग शाळा, रॅपिड अँटीजेन चाचणी अशा तीन टप्प्यात कोरोना विषाणूंनी चाचणी सुरू आहे. काल (बुधवारी) रात्रीपर्यंत प्रशासनाकडून 62 रुग्णांचे तर आज सकाळी राहीलेल्या 22 जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. काल एकाच दिवसात तब्बल 84 रुग्णांचे अहवाल प्राप्त झाल्याने धक्का बसला असून कालचा दिवस सर्वाधिक रुग्ण सापडण्याचा दिवस ठरला.

काल रात्री दहाच्या सुमारास रॅपिड अँटीजेनच्या चाचणीच्या अहवालातून शहरातील 11तर तालुक्यातील 32 संशयित रुग्णांची चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यात जनतानगरमधील 48, 26 व 19 वर्षीय महिला, खंडोबागल्लीतील 58 वर्षीय महिलेसह 36 वर्षीय तरुण, साळीवाडा परिसरातून 78 वर्षीय व्यक्ती, चैतन्यनगर 65 वर्षीय महिला, माळीवाडा 60, 55 व 26 वर्षीय महिला, उपासनी गल्लीतील 75 वर्षीय महिला तर तालुक्यातील गुंजाळवाडी 52 वर्षीय व्यक्ती, व 43 वर्षीय महिला,16 वर्षीय तरुणी व आठ वर्षीय बालक, कुरकुटवाडी 46 वर्षीय महिला, चंदनापुरी 49 व 37 वर्षीय पुरुषांसह 34 व 33 वर्षीय महिला व दोन वर्षीय बालिका, वडगाव पान 27 वर्षीय महिला व 21 वर्षीय तरुण, मेंढवण 34 वर्षीय तरुण व 30 वर्षीय महिला, गोरक्षवाडी 68 वर्षीय व्यक्ती, 28 वर्षीय तरुण, 34 वर्षीय महिला व 9 वर्षीय बालिका, रहिमपूर  65 वर्षीय महिला व 11 वर्षीय बालिका, चिकणी 53 वर्षीय पुरुषांसह 48 वर्षीय महिला, राजापूर अवघ्या 21 दिवसांची बालिका, संगमनेर खुर्द 32 वर्षीय तरुण, निमगाव टेंभी 26 वर्षीय तरुणासह 02 वर्षीय बालिका व 02 वर्षीय मुलगा, पानोडी 65 वर्षीय पुरुषांसह 20 वर्षीय तरुण, घुलेवाडी 57 व 50 वर्षीय महिलांसह 40 वर्षीय व्यक्ती संक्रमित आहेत.

काल रात्री उशीराने प्राप्त झालेल्या अहवालातून शहरातील 14 तर तालुक्यातील 8 असे एकूण 22 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.त्यात  गिरीराज विहार कॉलनी 64 वर्षीय व्यक्ती, वकील कॉलनी 54 वर्षीय व्यक्ती, नेहरु चौका 48 वर्षीय व्यक्ती, रहेमतनगर 70 वर्षीय ज्येष्ठ व्यक्ती, इंदिरानगर 52 वर्षीय महिलेसह 46 वर्षीय व 41 वर्षीय तरुण, स्वामी समर्थ नगर  69 व 68 वर्षीय ज्येष्ठ व्यक्तीसह 60 वर्षीय महिला, गणेशविहार कॉलनी56 वर्षीय व्यक्ती, श्रीराम कॉलनी 57 वर्षीय व्यक्तीसह 45 वर्षीय महिला व नवीन नगर रोड 56 वर्षीय व्यक्ती, तर, तालुक्यातील गुंजाळवाडी 27 वर्षीय तरुण, तळेगाव दिघे 72 वर्षीय ज्येष्ठ व्यक्ती, घुलेवाडी 69 वर्षीय महिलेसह 55 वर्षीय व्यक्ती व 30 वर्षीय तरुण, नांदुरी दुमाला 35 वर्षीय महिला, साकूर 41 वर्षीय तरुण व निमगाव जाळी 32 वर्षीय तरुण असे एकूण या अहवालातून 22 रुग्ण समोर आले. त्यामुळे बुधवारी दिवसभरात संगमनेर तालुक्याच्या रुग्णसंख्येत 84 रुग्णांची भर पडल्याने आज सकाळ पर्यंत तालुक्याची बधीत रुग्ण संख्या 1515 वर जावून पोहोचली आहे.

तालुक्याची एकुण रुग्णांची संख्या 1 हजार 515 जाऊन पोहचली आहे. तर आत्तापर्यंत उपचार पूर्ण करुन घरी परतलेल्या रुग्णांची संख्या1282 आहे. तसेच आता पर्यंत 27 रुग्ण हे दगावले  आहेत.त्यामुळे आता एकुण सक्रीय संक्रमित असलेल्या रुग्णांची संख्या 206 आहे. ते आज 38 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.या घटना संगमनेरकरणं साठी दिलासा दायक म्हणाव्या लागतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here