Karjat : मेन रोडवरील गाळे अबाधित ठेवत रस्ता व्हावा – सर्वपक्षीय पदाधिकारी यांचे निवेदन

Dr. Afrozkhan Pathan | Rashtra Sahyadri

कर्जत :  कर्जत शहरातील मेन रोडवरच्या कामामुळे गाळेधारकांवर मोठे संकट निर्माण झाले आहे. रस्ता व्हावा, विकासकामे व्हावेत याबद्दल दुमत नाही. पण हे करत असताना अनेक वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्याचे रोजगार बुडेल असे होऊ नये. त्यामुळे रस्त्याचे काम करीत मेन रोडवरील गाळे अबाधित कसे राहतील हे शासनाने आणि अधिकाऱ्यांनी पाहावे असे प्रतिपादन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांनी केले. ते कर्जतला सर्वपक्षीय मेन रोडवरील गाळेधारक प्रश्नावर आयोजित बैठकीत बोलत होते.

Contact for all types of Fruit & Vegetables basket : 18002670997

यावेळी सर्व पक्षीय आणि मेन रोड व्यावसायिक संघटनेच्यावतीने सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता अमित निमकर यांना गाळे बचावचे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी शिवसेनेचे बळीराम यादव, भाजपाचे जिल्हासरचिटणीस प्रसाद ढोकरीकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किरण पाटील, तात्या ढेरे, हर्षद शेवाळे, नगरसेवक डॉ संदीप बरबडे, स्वप्नील देसाई, नगरसेविका उषा मेहत्रे, अमृत काळदाते, अनिल गदादे, ओंकार तोटे, सतीश समुद्र, दत्ता कदम, सागर कांबळे यांच्यासह सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

       यावेळी बोलताना उपनगराध्यक्ष नामदेव राऊत म्हणाले की, गाळेधारक हाच आपला पक्ष असून सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येत गाळेधारकांच्या प्रश्नासाठी आज एकी दाखवली त्याचेच फलित म्हणून दोनच दिवसात त्याला यश मिळाले आहे. खा सुजय विखे, आ रोहित पवार यांनी अमरापूर- कर्जत- भिगवण रस्त्याच्या कामास शहरापुरते स्थगित ठेवले आहे. त्यामुळे गाळेधारकानी मनात भीती ठेवू नये.
  यावेळी बोलताना नगरसेवक सचिन घुले म्हणाले की, कोरोना काळात व्यापाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांची मोठी परवड आणि दैना पहावयास मिळाली. त्यात रस्त्याच्या कामाने आणखी मोठी भर पडली. रस्त्याच्या कामांमुळे जर मेन रोडवरील गाळेना धोका निर्माण झाल्यास त्यात नैराश्यातून चुकीचे पाऊल कोणी उचलू नये त्याची जबाबदारी शासनासह सार्वजनिक बांधकाम आणि संबंधित ठेकेदारावर राहील. याबाबत आपण कालच आ रोहित पवार यांची भूमिका मेन रोडवरील गाळेधारकाबरोबर असून त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय ते कोणताही निर्णय घेणार नाहीत हे स्पष्ट केले.
                याप्रसंगी कर्जत मेन रोड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष गणेश जेवरे म्हणाले की, अगोदरच कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन काळात व्यापारी बंधुचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. यासह कर्जत शहरातून जाणाऱ्या अमरापूर-कर्जत- भिगवण या रस्त्याचे काम सुरू असून मागील आठवड्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने मेन रोडवरील गाळ्याना मोजमाप करीत स्थान निश्चिती करण्यात आल्याने गाळेधारकांमध्ये आपला व्यवसाय जमीनदोस्त होण्याची भीती निर्माण झाली आहे. शहराचा विकास व्हावा ही सर्वांची भावना असून आमच्या व्यापाऱ्यावर अन्याय होणार याची खबरदारी शासनाने घ्यावी. या व्यवसायावर अनेक कुटुंब आपली उपजीविका करीत असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ येवू शकते. त्यामुळे गाळे अबाधित राहत सदरच्या रस्त्याचे काम पार पाडावे अशी मागणी गाळेधारकांच्यावतीने मांडली.
         यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख दीपक शहाणे, कर्जत नगरपंचायतीचे नगराध्यक्षा प्रतिभा भैलुमे, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष अशोक खेडकर, दादा सोनमाळी, सचिन पोटरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील शेलार, आरपीआयचे संजय भैलुमे,  नगरसेविका मनीषा सोनमाळी, काँग्रेसचे संतोष मेहत्रे, बहुजन वंचित आघाडीचे सोमनाथ भैलुमे, अड संग्राम ढेरे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.

  शहरात वाहतूक नियमन गरजेचे – बाळासाहेब साळुंके

       शहरातील मुख्य रस्त्यावर कायम वाहतूक कोंडी निर्माण होत आहे त्यामुळे सुद्धा शहराच्या विकासावर परिणाम होत आहे. त्यामुळे सर्वानी मिळत आपल्या दुकानासमोर गाड्या आणि वाहने पार्किंग होणार नाहीत याची काळजी घ्यावी. यासह शहरात कायम वाहतुक नियमन करण्यासाठी पोलीस नियुक्त करावे अशी मागणी बाळासाहेब साळुंके यांनी यावेळी केली.

 आपल्या सर्वांच्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहचविण्यात येतील – अभियंता अमित निमकर

           कर्जत शहरातील मेन रोडवरील गाळे अबाधित ठेवत अमरापूर-कर्जत-भिगवण रस्ता व्हावा यासाठी सर्वपक्षीयांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता अमित निमकर यांना निवेदन दिले होते. यावेळी उपस्थितांना उत्तर देताना निमकर यांनी आपल्या सर्वांच्या भावना शासनास आणि वरिष्ठ विभागास तात्काळ कळवू यासह सर्वाना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येतील असे सांगितले. 

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here