मेन रोडवरील गाळे अबाधित ठेवत रस्ता व्हावा – सर्वपक्षीय पदाधिकारी यांचे निवेदन

प्रतिनिधी | राष्ट्रसह्याद्री 

कर्जत :  कर्जत शहरातील मेन रोडवरच्या कामामुळे गाळेधारकांवर मोठे संकट निर्माण झाले आहे. रस्ता व्हावा, विकासकामे व्हावेत याबद्दल दुमत नाही. पण हे करत असताना अनेक वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्याचे रोजगार बुडेल असे होऊ नये. त्यामुळे रस्त्याचे काम करीत मेन रोडवरील गाळे अबाधित कसे राहतील हे शासनाने आणि अधिकाऱ्यांनी पाहावे असे प्रतिपादन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांनी केले. ते कर्जतला सर्वपक्षीय मेन रोडवरील गाळेधारक प्रश्नावर आयोजित बैठकीत बोलत होते. यावेळी सर्व पक्षीय आणि मेन रोड व्यावसायिक संघटनेच्यावतीने सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता अमित निमकर यांना गाळे बचावचे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी शिवसेनेचे बळीराम यादव, भाजपाचे जिल्हासरचिटणीस प्रसाद ढोकरीकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किरण पाटील,
 तात्या ढेरे, हर्षद शेवाळे, नगरसेवक डॉ संदीप बरबडे, स्वप्नील देसाई, नगरसेविका उषा मेहत्रे, अमृत काळदाते, अनिल गदादे, ओंकार तोटे, सतीश समुद्र, दत्ता कदम, सागर कांबळे यांच्यासह सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
       यावेळी बोलताना उपनगराध्यक्ष नामदेव राऊत म्हणाले की, गाळेधारक हाच आपला पक्ष असून सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येत गाळेधारकांच्या प्रश्नासाठी आज एकी दाखवली त्याचेच फलित म्हणून दोनच दिवसात त्याला यश मिळाले आहे. खा सुजय विखे, आ रोहित पवार यांनी अमरापूर- कर्जत- भिगवण रस्त्याच्या कामास शहरापुरते स्थगित ठेवले आहे. त्यामुळे गाळेधारकानी मनात भीती ठेवू नये

  यावेळी बोलताना नगरसेवक सचिन घुले म्हणाले की, कोरोना काळात व्यापाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांची मोठी परवड आणि दैना पहावयास मिळाली. त्यात रस्त्याच्या कामाने आणखी मोठी भर पडली. रस्त्याच्या कामांमुळे जर मेन रोडवरील गाळेना धोका निर्माण झाल्यास त्यात नैराश्यातून चुकीचे पाऊल कोणी उचलू नये त्याची जबाबदारी शासनासह सार्वजनिक बांधकाम आणि संबंधित ठेकेदारावर राहील. याबाबत आपण कालच आ रोहित पवार यांची भूमिका मेन रोडवरील गाळेधारकाबरोबर असून त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय ते कोणताही निर्णय घेणार नाहीत हे स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here