कर्जत शहरातील मेन रोडवरील गाळेधारकावर कोणताही अन्याय होणार नाही – आ रोहित पवार

2

प्रतिनिधी | राष्ट्रसह्याद्री

कर्जत :  कर्जत शहरातील मेन रोडवरील गाळे आहेत त्यांच्यावर कोणताही अन्याय होणार नाही. त्यांच्याशी चर्चा करूनच पुढील निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन आ रोहित पवार यांनी दिले आहे. त्यामुळे गाळेधारक यांनी मनात कोणतीही भीती ठेवू नये असे आवाहन नगरसेवक सचिन घुले यांनी पत्रकार परिषदेत केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील शेलार, गाळेधारक समितीचे अध्यक्ष गणेश जेवरे, विष्णुपंत नेटके, श्रीकांत तोरडमल, संतोष काळे, आण्णा मेहत्रे, ओंकार तोटे आदी उपस्थित होते.

कर्जत शहरातून भिगवण – कर्जत – अमरापूर या रस्त्याचे काम सुरू असून मागील आठवड्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने कर्जत मेन रोडवरील असणारे गाळे आणि टपऱ्या यांना खुणाकरीत स्थाननिश्चिती करण्यात आले. अनेक वर्षांपासून व्यवसाय करीत असणारे गाळेधारकामध्ये आपले गाळे जातील का ? आपला रोजगार कायमचा बुडेल का ? या शंकेने मोठी घबराट निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर कर्जतचे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ही महत्वाची बाब आ रोहित पवार यांच्या कानावर घातली. बुधवार दि २६ रोजी काँग्रेसचे नगरसेवक सचिन घुले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील शेलार यांनी कर्जत येथे पत्रकार परिषद घेत आ रोहित पवार यांची भूमिका स्पष्ट केली. आ पवार यांनी कर्जत शहरातील मेन रोडवरील गाळे आहेत त्यांच्यावर कोणताही अन्याय होणार नाही असे म्हटले असून आपण स्वता त्यांच्याशी चर्चा करूनच पुढील निर्णय घेणार आहोत. यासह सदर भिगवण – कर्जत – अमरापूर या रस्त्याचे काम कर्जत शहरापुरते थांबवण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे गाळेधारकांनी मनात कोणतीही भीती बाळगू नये असे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

आ रोहित पवार यांचे आभार – गणेश जेवरे

                      कर्जत येथील मेन रोडवरील व्यावसायिकाच्या प्रश्नाबाबत लोकप्रतिनिधी म्हणून आ रोहित पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. गाळेधारकांवर अन्याय होणार नाही अशी त्यांची भूमिका आहे. यासह कर्जतच्या व्यवसायिकासाठी काँग्रेसचे नगरसेवक सचिन घुले आणि राष्ट्रवादीचे सुनील शेलार यांच्यासह सर्व हितचिंतक यांनी तात्काळ त्यांच्याकडे दाद मागितली त्याबद्दल त्यांचे विशेष आभार आणि धन्यवाद कर्जत गाळेधारक समितीचे अध्यक्ष गणेश जेवरे यांनी मानले.

2 COMMENTS

  1. You really make it seem so easy with your presentation but I find this topic to be
    actually something that I think I would never understand.
    It seems too complex and extremely broad for me. I am looking forward for your next post, I will try to
    get the hang of it!

    Visit my web blog :: delta 8 thc vape

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here