कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गांधी विद्यालयातील खोल्यांचं निर्जंतुकीकरण 

कडा : आष्टीतील महात्मा गांधी विद्यालयाची नगर पंचायत कार्यालयाकडून कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर सर्व शाळा खोल्यांची स्वच्छता करुन निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली आहे.
तालुक्यातील महसूल व आरोग्य प्रशासनाकडून दि.१८ ऑगस्टपासून सलग तीन दिवस आष्टी शहरातील महात्मा गांधी विद्यालयात सलग तीन दिवस covid-19 या कोरोना विषाणूची तपासणी करण्यासाठी रॅपिड अँटीजन टेस्ट शिबीर घेण्यात आले होते. त्याच पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूचा परिसरात जंतुसंसर्ग होऊ नये. याकरिता नगरपंचायत कार्यालयाचे कर्मचारी शहादेव पायाळ, अविनाश जोगदंड व इतरांनी शाळा खोल्यांसह संपूर्ण परिसरात जंतुनाशक फवारणी केली आहे. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक जावेद पठाण, कर्मचारी शेख वाहेदभाई आदी उपस्थित होते.
Attachments area

9 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here