Shrirampur : बिबट्यानंतर शहर परिसर आणखी एका भीतीच्या सावटाखाली!

0

वाचा नेमके कोणामुळे निर्माण झाले भीतीचे वातावरण

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीरामपूर शहरासह ग्रामीण भागात परिसरात मोठया प्रमाणावर मोकाट कुत्र्याचा सुळसुळाट वावर वाढला असून वावरामुळे नागरिकामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाने तातडीने या शहर परिसरात येथील ग्रामीण भागातील ठिकाणावरील मोकाट कुत्र्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शहर भागातील लोकांनी व उक्कलगाव, गळनिंब कोल्हार रस्ता लम्हाणबाबा शिवार परिसरातील शेतकर्‍यांनी केली आहे. 

अनेक दिवसापासून या परिसरात मोकाट कुत्र्याचा मोठा त्रास लोकांना करावा लागत आहे. काही कुत्रे तर हातातील खाद्यपदार्थाच्या पिशव्या हाताला चावा घेत पोबारा करत होत आहे. अशा भीतीमुळे लोक चांगलेच भयभीत झाले आहे. यातील काहीच कुत्री चावा घेत आहे. काही ठिकाणी तर कायमच कुत्री किंचाळत असतात. कांदा मार्केट परिसरात मोकाट कुत्र्याचा वावर वाढला असल्यामुळे याठिकाणी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या कुत्र्यामुळे बाहेर फिरणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कांदा मार्केट परिसरात कुत्र्याचा वावर वाढला आहे. या मोकाट कुत्र्याचा बंदोबस्त करावा मागणी श्रीरामपूर शहर परिसरातून व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.
उक्कलगावमधील लम्हाणबाबा शिवारात वाबळे यांच्या गोठ्यात बांधलेल्या एका कालवडीवर पाच ते सहा मोकाट कुत्र्यांनी रात्रीच्या वेळाला चावा घेतला आहे. कुत्र्याच्या हल्ल्यामुळे कालवड गंभीर जखमी झाली आहे. त्यांच्यावर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यास तातडीने प्राथमिक उपचार करण्यात येत असल्याची माहिती उक्कलगाव येथील वाबळे यांनी दिली.
याबाबतच बाहेरील गावावरून रात्रीवेळाला उक्कलगाव व गळनिंब परिसरात मोकाट कुत्रे आणून सोडले जात असल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. उक्कलगाव प्रवरा नदीपात्र परिसरात बिबट्याचा वावर जास्त असल्यामुळे बिबट्याच्या भक्ष्यासाठी आणून सोडले जात आहेत तरी काय? अशी शंका उपस्थित होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here