Accident : जुन्नर येथे टेम्पोच्या अपघातात पारनेरच्या चार तरुणांचा मृत्यू

0

प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री

पारनेर तालुक्यातील करंदी येथील चार तरूण मुंबई येथे भाजीपाला विक्री करून परतत असताना शुक्रवारी पहाटे जुन्नर तालुक्यातील वडगाव आनंद दांगट मळ्याजवळील अपघातात करंदी येथील चार तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या अपघातात दोन तरूण जागीच ठार झाले असून इतर दोघांची प्राणज्योत आळेफाटा येथे उपचारासाठी नेत असताना मालवली असल्याची माहिती आळेफाटा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पी. वाय. मुजावर यांनी दिली.

अपघात एवढा भिषण होता की, त्यात जितो टेम्पोचा चक्काचूर झाला. पारनेर तालुक्यातील करंदी येथील सुरेश नारायण करंदीकर (उघडे), सिद्धार्थ राजेश करंदीकर (उघडे), आकाश सुरेश रोकडे, सुनील विलास उघडे असे ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत.

हे चौघे काल दि. 27 ऑगस्टला जितो छोटा हत्ती टेम्पो (क्रमांक एमएच 16 सी 6388) या वाहनाने मुंबई येथे भाजीपाला घेऊन गेले होते. भाजीपाला विक्री करून शुक्रवारी सकाळी परतत असताना आळेफाटा जवळील वडगाव आनंद येथे ठाण्याकडे जाणारा आयशर टेम्पो (क्रमांक एमएच 16, एई 9080) या वाहनाची जोराची धडक बसली. त्यामध्ये या चार तरुणांचा मृत्यू झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here